Death News esakal
नाशिक

Nashik : बाल्कनीतून तोल जाऊन महिलेचा मृत्यू

नरेश हाळणोर

नाशिक : सातपूर एमआयडीसीमध्ये इमारतीच्या बाल्कनीतून तोल जाऊन एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली. मंगला दत्तात्रय दळवी (वय 72) असं मृत महिलेचं नाव आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. (Woman dies after falling from balcony Nashik Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर एमआयडीसी भागात एबीबी कंपनीच्या पाठीमागे सोमेश्वर कॉलनीत मंगला दळवी यांच्या भावाचा फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये त्या आशा फडणवीस यांच्यासोबत राहत होत्या. मंगळवारी गॅलरीत उभ्या असतांना त्यांचा अचानक तोल गेला आणि त्या उंचावरून खाली पडल्या.

त्यामुळे मंगला यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मंगला यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT