Birth rates of girls are increasing, Nashik News Updates 
नाशिक

नाशिक : महिलेने दिला चक्क 3 बाळांना जन्म...!

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसरूळ (जि.नाशिक) : आजतागायत महिलेने एकावेळी दोन अपत्यांना जन्म दिल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, नुकतेच मूळ सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव येथील परंतु सध्या म्हसरूळ- मखमलाबाद रोड येथील रहिवासी महिलेने चक्क तीन बाळांना जन्म दिल्याची आनंददायी बाब समोर आली आहे. यात दोन मुली व एका मुलाचा समावेश असून विशेष म्हणजे तीन बाळांसह त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे. (Nashik News Updates)

शारदा रुग्णालयात ३० वर्षीय गायत्री गणेश महाले यांना प्रसूतीसाठी १६ मार्चला दाखल केले होते. रात्री नऊ वाजून ५२ मिनिटांनी एकापाठोपाठ तीन अपत्यांना जन्म दिला. जन्म वेळेत १ - १ मिनिटांचे अंतर आहे. या तीन अपत्यांमध्ये प्रामुख्याने दोन मुली आणि एक मुलगा आहे. या अपत्यांची प्रकृती चांगली असून वजन अनुक्रमे पहिले २ किलो १०० ग्रॅम, दुसरे २ किलो व तिसरे १ किलो ९०० ग्रॅम असे आहे.

घरी आल्यानंतर महाले कुटुंबीयांकडून त्यांच्या निवासस्थानी आईसह तीन चिमुकल्यांचे पुष्पवृष्टी (Flower showers) करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. गायत्री यांना तीन अपत्य होतील असे सोनोग्राफीमध्येच (Sonography) समजताच यांच्या पती गणेश यांना कळविले होते. गरोदरपणात महाले कुटुंबीयांकडून गायत्री यांची विशेष काळजी घेण्यात येत होती. अखेरच्या महिन्यात दिलेल्या तारखेला प्रसूती झाली. एकाच वेळी तीन अपत्यांचा जन्म झाला.

माजी आमदार धनराज महाले, माजी महापौर रंजनाताई भानसी, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावित, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनिषा महाले, विलास भोये, प्रशांत राऊत, हरीश वाघमारे, नाथ देशमुख, अरुण धंदूके, किरण धंदूके, मनपा पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडीया, सहाय्यक अधिक्षक भूषण देशमुख, प्रकाश उखाडे, दीपक मिंधे आदींनी अभिनंदन केले आहे.

"२०१४ मध्ये लग्न झाले. ८ वर्षे होऊनही अपत्य होत नव्हते. परमेश्वराने आम्हाला तीन अपत्य दिले आहे. यासाठी प्रसृतीतज्ञ डॉ. नंदा ठाकरे यांचे आम्ही मनापासून आभार मानले." - गणेश महाले, वडील

"सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की, गायत्रीच्या पोटात तीन बाळ आहेत. हे समजताच गायत्रीला खूप आनंद झाला होता. यानंतर गायत्रीने दिलेल्या सर्व सूचना व पथ्य व वेळोवेळी तपासणी केली. प्रसूतीत एकापाठोपाठ तीन बाळांना जन्म दिला. तीनही बाळ व आई सुखरूप असून त्याचा मला अभिमान आहे." - डॉ. नंदा ठाकरे, शारदा हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT