Woman loses money in fraud lottery
Woman loses money in fraud lottery esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: आमिषाला बळी पडून महिलेने गमावली जमा पुंजी; लॉटरीच्या नावाखाली 30 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवीस लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून शहरातील विधवा महिलेची आयुष्याची जमा पुंजी ऑनलाइन भामट्याने गिळकृंत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

दरम्यान, ऑनलाइन फसवणूक, लॉटरीचे आमिष, तत्काळ कर्ज मंजूर, केवायसी अपडेट, वीजबिल भरणा, मोबाईल बँकिंगद्वारे हॅकिंग यांसारख्या प्रकारांबाबत सायबर पोलिसांकडून वारंवार प्रबोधनात्मक जनजागृती केली जाते, असे असतानाही ऑनलाइन भामट्यांकडून सावज हेरून आर्थिक फसवणूक केली जाते. (Woman lost money 30 lakhs cheated in name of lottery Nashik Fraud Crime)

नाशिक रोड परिसरात निकिता कदम (नाव बदलले आहे) त्यांच्या मुलासह राहतात. त्यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या नोकरीची आलेली रक्कम निकिता यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर जमा होती.

त्या रकमेच्या व्याजावर आणि त्यांच्या इतर कामातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान, त्यांना डिसेंबर २०२२ च्या अखेरीस मोबाईलवर संशयित आकाश वर्मा नावाच्या व्यक्तीने फोन केला आणि आपल्याला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले.

मात्र निकिता यांनी नकार देत फोन बंद केला. परंतु संशयिताने वारंवार संपर्क साधून त्यांचा विश्‍वास संपादन केला. तसेच त्याने स्वत:ला एसबीआय बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगत त्याचे ओळखपत्र व आधारकार्डही पाठविले. त्यावरून निकिता यांचा विश्‍वास बसल्याने त्यांनी सुरवातीला साडेसहा हजार रुपये ऑनलाइन पाठविले.

त्यानंतर संशयिताने त्यांना लॉटरीची रक्कम वर्ग करण्यासाठी लागणाऱ्या पूर्ततेसाठी पुन्हा पैशांची मागणी केली. त्यानुसार निकिता यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले. यानंतर संशयिताने पुन्हा त्यांना लॉटरी, तर लागलीच आहे़. परंतु आपल्याला कारही बक्षीस म्हणून जाहीर झाल्याचे सांगितले. त्यासाठीही संशयिताने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

त्या-त्याप्रमाणे निकिता यांनी धनादेशाद्वारे संशयिताने सांगितलेल्या एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्र या खात्यांवर सुमारे ३० लाख ९०० रुपये वर्ग केले. यात, निकिता यांच्या खात्यावरील पैसेही संपत आले, तर दुसरीकडे संशयितांकडून आणखी पैशांची मागणी केली गेली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी नाशिक सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

रक्कम अडकल्याने गुंता

निकिता यांनी सुरवातीला संशयिताला टाळत तो क्रमांकही ब्लॉक केला. परंतु संशयिताने दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना खरंच लॉटरी लागल्याचे पटवून दिले. त्यानंतर निकिता यांनी दोन-तीन लाख रुपये दिले.

मात्र त्यानंतर त्यांनी लॉटरीचे पैसे नको म्हणून गेलेले पैसे परत करण्याची मागणी केली. त्या वेळी संशयिताने त्यासाठी आपल्याला दिल्लीला जावे लागेल, असे सांगत वेळ मारून नेली आणि पुन्हा पैसे मागत गेला. गेलेले पैसे परत मिळतील, यामुळे ऑनलाइन भामट्याच्या जाळ्यात निकिता अडकत गेल्या.

सायबर पोलिसांकडून तत्काळ हालचाली

निकिता यांची तक्रार घेतल्यानंतर नाशिक सायबर पोलिसांनी तत्काळ एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांशी संपर्क साधून ज्या-ज्या खात्यांवर पैसे वर्ग झाले आहेत, त्यांची माहिती मागविली तसेच, संशयितांचे सदरील खाते तत्काळ सील करण्याबाबतच्या सूचनाही संबंधित बँकांना दिल्या आहेत.

यावर साधा संपर्क

ऑनलाइन स्वरूपाची कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास २४ तासांच्या आत तत्काळ १९३० या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दाखल करावी. त्याचप्रमाणे नजीकच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Share Market Closing:: चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी राहिली आजची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

SCROLL FOR NEXT