Accidental Death News
Accidental Death News esakal
नाशिक

Nashik : फेम सिग्नलवर ट्रकच्या धडकेत मोपेडवरील महिला ठार

नरेश हाळणोर

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील फेम सिग्नल येथे डाव्या बाजुला वळण घेतलेल्या मोपेडला ओव्हर टेक करण्याच्या नादात ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये मोपेडवरील महिला ठार झाली तर मोपेडचालकासह चिमुरडी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (woman on moped was killed in collision with truck at Home signal Nashik Latest Marathi News)

लता शशिकांत गांगुर्डे (५६, रा. गांगुर्डे निवास, दसक, जेलरोड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. शशिकांत दामोदर गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता.१३) सायंकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास गांगुर्डे दाम्पत्य व त्यांची लहान नात यांना घेऊन ते ॲक्टिवा मोपेडे दुचाकीवरून नाशिक-पुणा रोडवरील फेम सिग्नलकडून डावीकडे वळाले. जनता विद्यालयाच्या विरोद्ध बाजुला असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच १५ एजी ८२१०) ओव्हर टेक करण्याच्या नादात गांगुर्डे यांच्या ॲक्टिवाला धडक दिली.

यात ॲक्टिवावर पाठीमागे बसलेल्या लता गांगुर्डे या गंभीररित्या जखमी झाल्या तर, शशिकांत गांगुर्डे व त्यांची लहान नात किरकोळ जखमी झाले. लता गांगुर्डे यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी ट्रकचालक दिलीप विश्‍वनाथ वाघ (५३, रा. पेठरोड) यांच्याविरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पी.डी. चौधरी हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT