ajmer saundane new.jpg 
नाशिक

संसार उध्वस्त करणारी 'ही' अवदसा गावात नकोच...अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : ( अजमीर सौंदाणे ) येथील ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात येईल असा इशारा महिला वर्गाने दिला आहे. ही अवदसा गावात नकोच म्हणून महिलांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. शेजारील गावातील लोकही वस्तीत येतात व धुडगूस घालतात. त्या संदर्भात पोलिसांकडून काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. असा आरोप महिलावर्गाकडून केला जात आहे.

पोलिसांकडून काहीही कार्यवाही नाही

सध्या लॉकडाउनच्या काळातही गावात दारूविक्री राजरोसपणे सुरू आहे. गावातील लोकांबरोबर शेजारील गावातील लोकही दारू पिण्यासाठी वस्तीत येतात व धुडगूस घालतात. त्या संदर्भात पोलिसांकडून काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा केलेला ठराव हा फक्त कागदोपत्री आहे. त्यामुळे संपूर्ण गावात दारूबंदीसाठी महिलांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्या संदर्भात इशारा निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला महिलांकडून देण्यात आला. त्यामुळे गावात त्वरित गावठी दारू विक्री बंद करावी नाहीतर ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे. अजमीर सौंदाणे गावातील आदिवासी वस्तीतील बहुसंख्य कुटुंबे गावठी दारू तयार करण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे गावात दारू मुबलकपणे उपलब्ध होते. त्यातून अनेक तरुणांचे संसार दारूमुळे उद्‌ध्वस्त होत असल्याचा गावातील महिलांचा आरोप आहे.

दारूबंदीसंदर्भातील ठरावाचे निवेदन पोलिस विभाग, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना देण्यात आले. त्यावर लवकरच निर्णय करण्यात येईल. - धनंजय पवार, सरपंच 

गावात दारूमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले. अनेक महिलांना रोजच भांडणाला सामोरे जावे लागते. म्हणून गावात दारूबंदी आवश्‍यक आहे. - रेखा मांडवडे, ग्रामस्थ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 Tax Reform : या तारखेपासून नवा आयकर कायदा लागू! आयकर रिटर्न ची तारीख वाढविली, जाणून घ्या काय बदललं

Latest Marathi News Union Budget 2026 Live : अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही

Union Budget 2026 : अपघात विम्याच्या व्याजावर कोणताही कर नाही ! अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पात महिलांसाठी नवी 'सी-मार्ट' योजना; लखपती दीदींनंतर महिलांच्या उद्योजकतेला मिळणार नवा आधार!

Union Budget 2026: 'युवा शक्ती प्रेरित बजेट’ मधील महत्वाच्या घोषणा आणि ठळक मुद्दे, जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT