Women crowd esakal
नाशिक

Rushi Panchami : महिलांची रामकुंडात स्नानासाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत- वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. (Women crowded to Ramkunda for bathing Rishi Panchami Nashik Latest Marathi News)

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात हे पूजा विधी बंद असल्याने यंदा महिलांची रामकुंड परिसरात स्नानासाठी तोबा गर्दी केल्याचे बघायला मिळाले. त्यात बुधवारी (ता. ३१) शहरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली असल्याने रामकुंडातील पाणी रस्त्यावर आलेले होते.

त्यातच ब्राम्हण आणि महिलांनी ऋषिपंचमीची पूजा रस्त्यावर मांडली. त्यामुळे गंगाघाट परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. तर दुपारपर्यंत रामकुंड येथील पोलिस चौकी देखील बंद होती. शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक टपरीधारकांनी आपल्या टपऱ्या सकाळीच सुरक्षित स्थळी हलविल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

Eknath Shinde : लाडक्‍या बहिणीच बदलतील कारभारी; शिवसेना उमेदवारांसाठी नाना पेठ, कात्रजमध्ये सभा

UPSC Interview Tips: UPSC मुलाखतीत काय विचारले जाते? जाणून घ्या बोर्डचे प्रश्न आणि सोपे टिप्स

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड-सोलापूर दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT