Womens nmc Election reservation
Womens nmc Election reservation  esakal
नाशिक

Nashik : आंदोलनाला कार्यकर्ती, उमेदवारी मात्र घरच्यांना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीची (NMC elections) धामधूम सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेत (NMC) पन्नास टक्के म्हणजे ६७ महिलांना नगरसेविका (Corporate) होण्याची संधी मिळणार आहे. मात्र, बहुतांश प्रभागात महिला आरक्षणामुळे (Women Reservation) संधी हुकलेल्या इच्छुकांनी स्वतःच्या घरातील पत्नी आणि आईला पुढे केल्याने (Nepotism) पक्षातील सक्रिय महिला कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. एरवीही पक्षाच्या आंदोलनाला पुढे असणाऱ्या महिला इच्छुकांच्या यादीत मात्र इच्छुकांच्या नातेवाइकांमुळे पिछाडीवर पडतात, ही सामान्य महिला कार्यकर्त्यांची व्यथा आहे. (women party worker candidates not getting chance over nepotism NMC election Nashik News)

महिला पदाधिकाऱ्यांच्या भूमिका

"शिवसेना महिला आघाडी कार्यकर्त्यांनाच प्राधान्‍याने संधी द्यावी. पक्ष संघटनेत आंदोलनात अग्रभागी खऱ्या निष्ठावान महिला कार्यकर्त्‍यांना संधी मिळाली पाहिजे, हीच भूमिका आहे. शिवसेनेत नक्‍कीच संधी मिळेल. सेनेसाठी केलेल्या कामातून पुढे आलेल्या महिला शिवसैनिकांना संधी दिली पाहिजे. ज्या वॉर्डात महिला कार्यकर्त्‍या नसतील तर, अशा वेळेस सक्षम असलेल्‍या नात्‍यातील उमेदवारांना संधी देण्यास हरकत नाही. "

-शोभा मगर, शिवसेना महिला आघाडी संघटक

"पक्षप्रमुख शरद पवारसाहेबांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात महिलांसाठी राजकीय आरक्षण आणले. त्यामुळे महिलांना न्याय मिळावा, ही पक्षाची भूमिका आहे. महापालिका निवडणुकीत खऱ्या अर्थाने ज्या महिला कार्यकर्त्या ग्राउंड लेवलवर काम करतात, मोर्चे-आंदोलनात सहभाग घेऊन पक्षाच्या भूमिका, चिन्ह लोकांपर्यंत पोचवितात अशा महिलांना प्रामुख्याने उमेदवारी देताना प्राधान्य दिले पाहिजे. पक्षातही ग्रामीण भागातील सक्षम व सक्रिय महिलांना संधी दिली आहे. "

-प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस

"राजकीय पक्ष संघटनेत पुरुष कार्यकर्त्यांचा प्रभाव असतो. उमेदवारी मिळविताना असे जाणकार नेते युक्ती करतात आणि घरातील महिलांना पुढे करतात. त्यामुळे कार्यक्षेत्रात ज्‍यांनी खरच विकास घडवून आणला आहे, अशा महिला कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळावे. ज्‍यांची खरच निवडून येण्याची क्षमता आहे. मात्र पक्ष तिकीट वाटप करताना जाणीवपूर्वक विसरतो. निकष लावून तिकीट वाटप करणे यात याचा विचार होत नाही. यामुळे खऱ्या अर्थाने समाजासाठी झटणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष होते. पक्षाकडे मी हीच भूमिका मांडणार आहे. "

- रोहिणी नायडू, शहराध्यक्ष, भाजप महिला आघाडी

"निवडून येण्याची क्षमता असलेल्या, तसेच आपल्‍या भागात विकासाच्या दृष्‍टीने काम केलेल्‍या महिलेला संधी मिळाली पाहिजे. प्रसंगी नात्‍यातील महिलेने विकासाची कामे केलेली असतात, सक्षम असतात त्‍यांना उमेदवारी देण्यास हरकत नाही. सच्ची कार्यकर्त्यांची आर्थिक क्षमता कमी असते, तसेच मनुष्‍यबळाचा अभाव या प्रमुख समस्‍या असतात. अशा वेळेस त्‍यांना आर्थिक पाठबळ देऊन संधी द्यावी, यासाठी पक्षाकडे आग्रही भूमिका मांडणार आहे. "

- सुजाता डेरे, मनसे पदाधिकारी व माजी नगरसेविका

"पक्षातील काम करणाऱ्या महिलांनाच संधी दिली पाहिजे. पक्षात ज्‍या काम करतात, त्‍यांचा चेहरा लगेच समोर येतो. तळागाळातील महिलांना उमेदवारीसाठी संधी मिळाली पाहिजे. सक्षम व सक्रिय महिलांना त्‍यांच्‍या कामाची दखल घेऊन संधी दिली पाहिजे, अशीच आपली भूमिका आहे. आंदोलनात, मोर्चात सक्रिय सहभाग असणाऱ्या, तसेच खऱ्या अर्थाने जनतेच्‍या सेवेसाठी कष्‍ट घेणाऱ्या कार्यकर्त्या महिलांचा प्रामुख्‍याने विचार करून संधी देण्‍यासाठी आग्रही भूमिका मांडणार आहे." - वत्‍सला खैरे, शहराध्यक्ष, महिला काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT