Police women celebrating Vatpoornima esakal
नाशिक

Nashik : कर्तव्य बजावतानाही जपले वटपोर्णिमेचे व्रत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरात ठिकठिकाणी वटपौर्णिमा (Vat purnima) उत्‍साहात साजरी झाली. महिलांनी सकाळपासूनच जवळच्या वडाच्या झाडाजवळ पूजेसाठी गर्दी केली होती. गृहिणी, नोकरदार महिलांची सकाळपासूनच पूजेसाठी लगबग सूरू होती. महिला कर्मचारी पोलिसांना (Women Police) १२ तासांची ड्यूटी असते. अशावेळी घरी जाऊन नटून, थटून पूजा करण्यास वेळ मिळत नाही. तरीही यावर मात करत कर्तव्यावर असताना आपल्‍या हद्दीतील वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्‍याची त्यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली. महिला पोलिसांनी कर्तव्य बजावतानाही जपले व्रत जपले. (women police Celebrated Vat purnima festival Nashik News)

सत्‍यवान आणि सावित्री कथा व त्यानुसार वटपौर्णिमाचे महत्त्व सर्वश्रृत आहे. पतीच्या दीर्घायुष्‍याची तसेच आरोग्‍य यासाठी सर्वगुणसंपन्न अशा वडाच्या झाडाची पूजा करून महिला प्रार्थना करतात. हल्‍लीच्या युगात पत्‍नी व पत्‍नी यांना समान दर्जा आहे. पती- पत्‍नी एकमेकांना समजून आदराने वागतात. महिला या पुरूषांच्या बरोबरीने कमावती झाली आहे. नाशिक शहरात एकमुखी दत्‍त, पंचवटी, तपोवन, जुने नाशिक, वेदमंदिर, इंदिरानगर, गोविंदनगर, गंगापूर रोड अशा ठिकठिकाणी वडाची पूजा करून महिलांनी पतीविषयी असलेले प्रेम व्यक्‍त केले. नोकरदार महिलाही आपल्‍या वेळेचे नियोजन करून पूजा करताना दिसल्‍या.

नातेसंबंधातील ओलावा कायमस्‍वरूपी टिकून राहण्यासाठी भारतीय संस्‍कृतीत एकत्र कुटुंब पध्दत तसेच प्रत्‍येक महिन्यातून येणाऱ्या सणाचे विशेष असे महत्त्व आहे. वटपौर्णिमा म्‍हणजे पती पत्‍नीच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. पती- पत्‍नीचे नाते व प्रेम हे कायम टिकून राहण्यासाठी वर्षातून एकदा येणाऱ्या ज्‍येष्‍ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते. यातून पर्यावरण संवर्धन हाही संदेश सर्वांपर्यंत पोचतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा चाकाखाली चिरडून मृत्यू; चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

Baramati Election: माघार न घेतल्यास काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव अटळ: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शरद पवारांनी काँग्रेसला योग्य सल्ला द्यावा!

IPL 2026: CSK संघ का करतोय मोठा संघर्ष? प्रशिक्षक फ्लेमिंग यांनीच सांगितलं खरं कारण; सॅमसनबद्दलही म्हणाले, 'तो अजूनही...

Viral Video: भयानक व्हिडिओ! पनामा कालव्याच्या पुलाजवळ इंधन टँकरचा स्फोट; ४ जण जखमी, एक बेपत्ता

Imran Syed Firing Video : छत्रपती संभाजीनगरात दहशत! शिव्या देत हवेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड इम्रान सय्यदचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय करतोय?

SCROLL FOR NEXT