Female Priest Dipti Mulay esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : गुरूंच्या सान्निध्यात अशक्‍यही शक्य

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दीप्ती मुळे यांची ओढ धार्मिकतेकडे होतीच, तसेच त्‍यात अजून भर पडली त्या नाशिकला आल्‍यावर. आपली आवड जोपासावी म्‍हणून त्‍यांनी पौरोहित्‍याच्या वर्गात प्रवेश घेतला. गुरूंच्या सान्निध्यात अशक्‍यही शक्य असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधत आपल्या प्रवासाविषयीचे अनुभव कथन केले. (women rule in priesthood dipti Mulay nashik Latest Marathi news)

दीप्ती मुळे यांचे माहेर हे भुसावळचे. लहानपणापासूनच घरातील वातावरण कुलधर्म कुळाचार, धार्मिक जपवणूक यामुळे त्‍यांचा ओढा धार्मिकतेकडे होता. त्‍यांचे सासर चाळीसगाव येथील आहे. पतीच्या नोकरीनिमित्‍त त्‍या नाशिक गंगापूर रोड येथे स्थित झाल्‍या.

त्‍यांच्या मैत्रिणी राणी भवन येथे पौरोहित्‍य शिकण्यासाठी जात. या‍मुळे त्‍यांनाही कुतूहल निर्माण झाले. त्‍यांनी २००३ मध्ये प्रवेश घेतला. तीन वर्ष वर्गाचे शिक्षण व पुढील वेदोक्‍त शिक्षणासाठी श्रीमती दुगल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.

मंत्राचे अर्थ, उच्चार याचा आपल्यावर तसेच आसपासच्या वातावरणावर, एकूणच जीवनावर सकारात्‍मक परिणाम होतो. माधुरी जोशी, श्रीमती देशपांडे, जयश्री कुलकर्णी यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. नंतर पौरोहित्‍याच्या वर्गासाठी मार्गदर्शन करत गीतेचे वर्गही घेत आहे.

कोरोनाकाळात ऑनलाइन वर्गात दुबई, केनिया येथील महिलांनाही मार्गदर्शन करत आहे. हे सारे शक्‍य झाले ते गुरूंच्या आशीर्वादानेच, त्‍यांच्या निरपेक्ष मार्गदर्शनाने. आध्यात्‍मिक प्रगतीतही महिला पुढे आल्‍या आहेत याचाही आनंद होतो.

तसेच याचा सकारात्मक परिणाम कुटुंबावर तर झालाच तसेच आपण वावरत असलेल्‍या च समाज व पर्यायाने राज्‍यावरही होत असतो. मुलीचे विष्णुसहस्रनाम पठण झाले. त्‍यांच्या पतीकडूनही खूप सहकार्य होते.

यामुळे त्यांचा कल वाढत जाऊन अधिक जोमाने व आवडीने पुढचे शिक्षण घेतले. आषाढी एकादशीला ऑनलाइन गीतेचे पूर्ण अध्याय वाटप करून पाठ करण्यात आला. तसेच स्‍त्रीसुक्‍त, सहस्रनाम यांचे पठण केले. हे सारे गुरुजनांमुळेच शक्‍य झाल्याचे ते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT