Female Priest Madhuri Deshpande esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : समाजानेही सकारात्मकतेने पुरोहिता म्‍हणून स्वीकारले

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार : पल्‍लवी कुलकर्णी - शुक्‍ल

नाशिक : कोरोनाकाळात ऑनलाइन वर्ग सुरू केले आणि विशेष म्‍हणजे गावोगावी असलेल्‍या महिलांचाही या वर्गात सहभाग वाढला. यामुळे जास्‍तीत- जास्‍त महिलांपर्यंत पोचल्याचा आनंद वाटतो, असे मत महिला पुरोहिता माधुरी देशपांडे यांनी व्यक्त केले.

आठवड्यातून एकदा जिल्‍हा परिषद शाळा हरसूल येथे वर्ग घेण्यासाठी जात असल्याचे सांगून या प्रवासात कुटुंबाकडूनही कौतुक व प्रोत्साहन मिळाले. तसेच, समाजानेही सकारात्मकतेने पुरोहिता म्‍हणून स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले. (Women rule in priesthood madhuri deshpande Society also accepted positively as priesthood Latest Marathi News)

माधुरी देशपांडे यांचे माहेर मुंबईचे. लग्‍नानंतर त्‍या विद्या विकास सर्कल, नाशिक येथे स्‍थित झाल्‍या. लहानपणी अथर्वशीर्ष व रामरक्षा एवढेच पाठ होते. पौर्णिमा मंडलिक यांच्या प्रेरणेने राणी भवन येथे पौरोहित्‍य शिकण्यासाठी वर्गात १९९२ मध्ये प्रवेश घेतला.

शिकताना मंत्र, त्‍यांचा अर्थ तसेच त्‍यामागचा विचार जाणून घेताना गोडी निर्माण झाली. तसेच, संगीत विशारद असल्‍याने याचा फायदा झाला. त्यांनी पाच वर्ष शिक्षण घेतले, तसेच पुढच्या शिक्षणासाठी साने गुरुजी व विद्या दुगल यांचे मार्गदर्शन मिळाले.

पौराहित्‍य शिकताना साधनेत शुध्द व स्‍पष्‍ट उच्चार, मंत्राचे स्‍वर हे योग्‍य पद्धतीने म्हणणे याची सारी जबाबदारी आपल्‍यावर असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. कोरोनाकाळात ऑनलाइन वर्ग सुरू केले. या वर्गाचा फायदा म्‍हणजे बाहेरगावच्या महिलांना झाला.

पुणे, मुंबई, नागपूर येथील महिलांचाही वर्गात सामावेश आहे. दर शनिवारी ३ ते ५ या वेळेत ऑनलाइन वर्ग घेतले जातात. तसेच पौराहित्‍य करतानाच्या अनुभवात रूद्र, लघुरुद्र महिलांनी केले त्‍याचा प्रत्‍यय कुटुंबासाठी सकारात्‍मक झाल्याचे त्यांनी सांगितले.

पहिली मंगळागौरीची पूजा करताना उपस्‍थित मंडळींनाही कुतूहल असते. महिला पुरोहिता म्हणून केलेली पूजा पार पडल्‍यावर येणाऱ्या प्रतिक्रिया छान असतात, असेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच, वणी येथे सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात सप्तशती पाठ दहा महिलांनी मिळून केल्याचा अनुभव प्रसन्नदायी असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT