Female Priest Prachi Thombre esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : चांगली प्रतिक्रिया हीच कार्याची पावती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढल्‍याने आवड तर होतीच स्वतः मामेसासूबाई शिकवत असतं. त्‍यामुळे त्‍यांनी पौराहित्‍य करण्यासाठी प्रोत्‍साहन दिले. असे प्राची ठोंबरे यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना त्यांच्या प्रवासाविषयी सांगितले. (women rule in priesthood prachi thombre Nashik latest marathi news)

प्राची ठोंबरे यांचे माहेर शिरपूर येथील. वडील पूजा सांगत तसेच गुजरातचे नारेश्‍वर दत्‍तपंथीय महाराज यांचे शिष्‍य असलेले भाऊ स्‍वर्गे श्रीपाद श्रीवल्‍लभ अनुयायी. त्यांचा तळेगाव येथील आश्रमात भाऊ स्‍वर्गे घरी येत असे.

घरी भजनाचे कार्यक्रम होत. सर्व ऐकून पूजा, श्रध्दा, निष्‍ठा याची आवड निर्माण झाली. सासर मालेगाव येथील आजेसासरे मालेगाव कॅम्‍प येथील देवीच्या मंदिराचे पूजारी. त्‍यामुळे सासरी आणि माहेरी धार्मिक वातावरण होतेच.

पतीच्या नोकरीनिमित्‍त नाशिक येथे स्‍थित झाले. मामेसासूबाई उषा गायधनी या राणी भवन येथे वर्ग घेत होत्‍या. त्‍यांच्‍याकडून प्रोत्‍साहन मिळाले. त्‍यांनी शिकण्यासाठी आग्रह केला. आवड असल्‍यामुळे २००४ मध्ये वर्गात प्रवेश घेतला.

जयश्री कुलकर्णी यांचे छान मार्गदर्शन मिळाले. पाच वर्ष वर्गाचे शिक्षण पूर्ण केल्‍यावर श्रीमती दुगल आणि साने गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळाले.

नंतर प्रथम वर्षाचे वर्ग त्‍या घेवू लागल्‍या. महिलांना पौरोहित्‍य करण्यासाठी प्रोत्‍साहन व देवाची इच्छा म्‍हणून त्‍याने आपल्‍याला इथपर्यंत आणले मग आपणही ते आवडीने केले पाहिजे यासाठी महिलांना प्रोत्साहित केले. कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला.

पौरोहित्‍य करताना पत्ता शोधण्यापासून तर तेथे पोचविणे हे काम पती आवडीने करायचे, असेही प्राची ठोंबरे यांनी या वेळी सांगितले. पतीने त्‍यांच्यासाठी गाडी घेऊन दिली आणि त्‍यामुळे पूजेला हजर राहणे सोपे झाले.

मुलांवरही खूप सकारात्‍मक परिणाम झाला. मुलांचेही स्‍तोत्र पठण, स्‍त्री सुक्‍त पठण होत गेले. पूजा केल्यानंतरचे समाधान तसेच समोरून येणारी चांगली प्रतिक्रिया हीच आपल्‍या कार्याची पावती असते. त्‍यामुळे मनाला प्रसन्नता लाभते, असे प्राची ठोंबरे यांनी आपल्या प्रवासाविषयी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT