female priest vaishali vaidya esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रोच्चार, मंत्रपठणातून स्‍मरणशक्‍तीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मंत्रपठणाने स्‍मरणशक्‍तीत वाढ झाल्यामुळे सत्तरीतही एम. ए. योगशास्‍त्र नागपूर विद्यापीठातून करताना अगदी सहजगत्‍या अभ्‍यास होतो, असे वैशाली वैद्य यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना सांगितले. तसेच, पौरोहित्‍याच्या प्रवासाविषयी ही वर्णन केले. (women rule in Priesthood Vaishali Vaidya nashik latest marathi news)

वैशाली वैद्य यांचे माहेर नाशिकचे. त्‍यांच्या आईला वाचनाची प्रचंड आवड होती, हा गुण त्‍यांच्यातही जसाच्या तसा उतरला. नाशिक येथील लहानपणीच सार्वजनिक वाचनालयातून संस्‍कृत ग्रंथ, पुस्‍तकांचे वाचन केले.

त्‍यांचे सासर अलिबाग नागाव येथील, परंतु पतीच्या नोकरीनिमित्त नाशिक येथे स्‍थित झाल्‍या. तसेच त्‍या स्वतःही इरिगेशन मेरी विभागात नोकरीला होत्‍या. तसेच त्‍या समितीचेही काम करत. त्‍यामुळे राणी भवन येथे येणे- जाणे असतं.

१९९० मध्ये पौरोहित्‍याचे वर्ग सुरू झाले तेव्हा संस्कृतीची आवड असल्‍याने वर्गात प्रवेश घेतला. वीणा मोडक यांच्याकडे तीन ते चार वर्षे शिक्षण घेत पुढील शिक्षण त्‍यांनी दातार व साने गुरुजी यांच्याकडे घेतले. तसेच १९९३ मध्ये वर्गात महिलांना शिकविण्याची संधी त्‍यांना मिळाली.

महिलांचा रुद्राचा वर्ग त्‍यांनी घेतला. नोकरीच्‍या ठिकाणी ऑफिसमध्ये ३० ते ४० महिलांचा ग्रुप होता, तेव्हा जेवणाच्या सुटीत किमान अर्धा तास त्‍या महिलांना गीतापठण तसेच स्‍तोत्रपठण शिकवत. त्‍यामुळे आपल्‍याकडचे ज्ञान वाटल्यामुळे आनंद होतो. यामुळे मिळणारे समाधान अनन्य साधारण होते. कुटुंबातूनही त्‍यांना पाठिंबा होता.

पुरोहित म्‍हणजेच पुढच्याचे हित यात पूजकाने केलेला संकल्‍प आणि तो पूर्णत्‍वास नेण्यासाठीचे आपण माध्यम असतो यातून मिळणारा आनंद उच्चकोटीचा आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले. तसेच त्‍यांनी मालपाणी कॉलेजला संस्‍कृत एम. ए. केले.

विशेष म्हणजे त्‍याच कॉलेजला संस्‍कृत विषयासाठी प्राध्यापिका म्‍हणून संधीही मिळाली. एचपीटी येथे योगभवन येथून त्‍यांनी योगरत्‍न पदवी मिळविली आहे. तळवाडे येथील योगधाम विद्या गुरुकुल येथे योगाचे शिक्षण त्‍यांनी दिले. एवढेच नव्हेतर आजदेखील वयाच्या सत्तरीत त्‍या नागपूर येथील योग विद्यापीठातून योगशास्‍त्रात एम. ए. करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT