Women waiting for hours with empty water bottles in front of the only hand pump in the village to get a full water bottle esakal
नाशिक

Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी ठोकळवाडीचा टाहो! अमृत महोत्सवी वर्षातही महिलांच्या नशिबी संघर्षच

राम शिंदे

Water Crisis : इगतपुरी तालुक्यात पूर्व भागातील ठोकळवाडी परिसरात तीव्र पाणी टंचाईमुळे ‘कुणी घोटभर पाणी देतं का पाणी?’ असा टाहोच जणू येथील माता-भगिनी अन्‌ ग्रामस्थांना फोडावा लागतोय. (women struggle in Amrit Mahotsav year fro Water Crisis in thokalwadi nashik news)

रखरखत्या उन्हात पायाला फोड येईपर्यंत पायपीट करताना डोंगर, दऱ्या-खोऱ्यांतील वाट तुडवावी लागतेय.

ठोकळवाडीतील महिलांना पाण्यासाठी आजही रोजची धडपड, तारेवरची कसरत अन्‌ संघर्ष करावा लागतोय. रखरखत्या उन्हात पायाला फोड येईपर्यंत पायपीट करताना डोंगर, दऱ्या-खोऱ्यांतील वाट तुडवावी लागतेय.

काटेरी, दगड धोंड्याची वाट तुडविताना अनेकदा डोक्यावरील दुडीसह कोसळून जखमीदेखील व्हावे लागतेय. डोक्यावर हांडे अन्‌ कमरेवर तान्हेले बाळ घेऊन तारेवरची कसरत करावी लागतेय. प्रसंगी वृद्ध व गर्भवतींनासुद्धा पाण्यासाठी नाईलाजाने बाहेर पडावे लागते.

वाडीतील एकमेव हातपंपासमोर तासंतास बसून पाण्याची प्रतिक्षा करावी लागतेय. दरम्यान, ठोकळवाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न पंचायत समितीसमोर मांडला असता, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी पाण्याचा प्रश्‍न लवकरात लवकर सोडविणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे.

दुर्दैव की अपयश?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातदेखील येथील ग्रुप ग्रामपंचायत मायदरा-धानोशीतील ठोकळवाडीत पिण्याचे पाणी पोहचलेले नाही. हे महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताचे दुर्दैव समजावे की जनतेने निवडून दिलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश? असा प्रश्‍न येथील परिस्थिती बघिल्यानंतर सामान्य माणसांसमोर स्वाभाविकच उभा ठाकतो.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

योजना कागदावरच

ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी निवडून दिले. मात्र, कुणीही आमच्या वाडीची पाणी समस्या आजवर सोडविली नाही. येथे पेयजल योजनाही चुकीच्या पद्धतीने राबवली गेली. ती फक्त नावालाच व कागदावरच आहे.

प्रत्यक्षात गुरा-वासरांना प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे यापुढे मत मागायलासुद्धा कुणी येऊ नये, अशी ताकीदच स्थानिक महिलांच्या रोषातून व्यक्त होत आहे.

"पाण्याचा कोणताही शाश्‍वत उद्‌भव नसल्याने लवकरच टँकर सुरू करण्यात येईल. पुरेसे पाणी असलेला हातपंप अथवा विहीर अधिग्रहणासाठी प्रयत्न केले जातील. लवकरच एमजीपीमार्फत आठ गाव पाणी पुरवठा योजनेंतर्गत भाम धरणातून या गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे."

-डॉ. लता गायकवाड-मते, गटविकास अधिकारी, पं. स. इगतपुरी

"दरवर्षीप्रमाणे ठोकळवाडीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, इगतपुरी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे टँकरची मागणी केली आहे."

-पुष्पा साहेबराव बांबळे, सरपंच, मायदरा-धानोशी

"लग्न होऊन आल्यापासून आजपर्यंतही येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कोणीही सोडविलेला नाही. गुरा-वासरांना पिण्यासाठी, मुला-बाळांना अंघोळ व कपडे धुण्यासाठी आठ-आठ दिवस थांबावे लागते. आमचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटेपर्यंत मत मागायलाही कुणी वाडीत येऊ नये."

-बसवंता जाधव, ग्रामस्थ, ठोकळवाडी

"माझ्या तरुणपणापासून ते वयोवृद्ध होईपर्यंत येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कुणीही सोडविला नाही. पाण्याची सोय नाही, तर कसे दिवस काढायचे? कसे जगायचे? शासनाने आतातरी आमची दखल घेऊन पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविला पाहिजे."

-जिजाबाई करवंदे, ज्येष्ठ महिला, ठोकळवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT