Women officers with Jyoti Gosavi in ​​charge of Deola Police Station on the occasion of Women's Day. esakal
नाशिक

Womens Day 2023 : महिला पोलिस नाईक बनल्या प्रभारी अधिकारी

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा (जि. नाशिक) : जागतिक महिला दिनाचे (womens day 2023) औचित्य साधत महिला कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने देवळा पोलिस ठाण्याची एका दिवसाची जबाबदारी महिला पोलिस नाईक ज्योती गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. (womens day 2023 lady police naik become officer in charge nashik news)

त्यांनी सकाळपासून पोलिस ठाण्याचा कारभार उत्साहाने सांभाळला. देवळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी प्रभारी अधिकारी पदाची जबाबदारी पोलिस नाईक ज्योती गोसावी यांच्याकडे सोपवित महिला दिनी आगळा-वेगळा सन्मान केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी गुलाब पुष्प देऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

पोलिस ठाण्याचा एक दिवसीय कामकाज सोपवून कामाचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने केला आहे. पोलिस दलात भरती होऊन आम्हाला महिलांचे प्रश्‍न सोडविण्याची संधी मिळाली आहे. महिला दिनी पोलिस ठाण्याचा कारभार सांभाळून आनंद वाटला. महिला पोलिसांना रोजच सन्मान मिळतो, पण आजच्या दिवशी अधिकच छान वाटत असल्याचे ज्योती गोसावी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT