work from home.jpg 
नाशिक

Lockdowneffect : 'वर्क फ्रॉम होम'मुळे लठ्ठपणा वाढलाय?...मग हे वाचा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे जगभरात लॉकडाउन सुरू झाल्याने अनेकांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली. "वर्क फ्रॉम होम'चा निर्णय घेत अनेकांनी घरी बसून कामे सुरू केली. मात्र दिवसभर लॅपटॉप, स्मार्टफोनचा वाढता वापर व बैठ्या कामाने शरीराची हालचाल होत नसल्याने अनेकांना लठ्ठपणाची समस्या जाणवू लागली आहे.

अपचन होण्याचे प्रमाण वाढले

कार्यालये व व्यवसाय बंद असल्याने शारीरिक हालचाली होत नसल्याने शरीरातील कॅलरीज जळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचे रूपांतर अतिरिक्त चरबीत होऊन वजनात वाढ होत आहे. तसेच लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या व व्यवसाय बंद झाले आहेत. यामुळे बेरोजगारी व आर्थिक तणावामुळे अनेकांना मानसिक तणाव जाणवू लागला आहे. परिणामी आहारात वाढ होऊ लागली आहे. घरी असल्याने झोप घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्याचबरोबर पचनक्रियेशी निगडित समस्या जसे पित्त, बद्धकोष्ठता व अपचन होण्याचे प्रमाण वाढले आहे. तेलकट-तुपकट पदार्थांचे अतिरिक्त सेवन टाळले पाहिजे, तसेच नियमितपणे घरच्या घरी हलकेफुलके व्यायाम व योगा करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे? 

- तेल-तुपाच्या पदार्थांचे सेवन टाळावे 

- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घ्यावा 

- पालेभाज्या व मोसमी फळांचे सेवन करावे 

- रोज दहा ते बारा ग्लास पाणी प्यावे 

- फास्टफूड खाणे टाळावे 

- घरी बनवलेले व ताजे पदार्थ खावेत 

- व्हिटामिन "सी'युक्त फळे नियमित खावे 

- रोजच्या आहारत संत्री, मोसंबी, लिंबू घ्यावे 

दैनंदिन आहारात सकस व ताजा आहार घेणे गरजेचे आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात फळे, कडधान्ये, पनीर, मशरूम, दूध, अंड्यांचे सेवन करायला हवे. कोरोनामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाणे पूर्णपणे टाळायला हवे. - सोनाली हाटकर, आहारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Woman Minister Husband Controversy : महिला मंत्रीच्या पतीचा इंग्लिश नजराणा, अनेकांसोबत ठेवले संबंध; मंत्री पत्नीला ठार करण्याचा रचला कट

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT