work of checking minds of attending procession and meeting of chhagan bhujbal also started nashik news esakal
नाशिक

Chhagan Bhujbal Latest Update : भुजबळांच्या बैठकीला शरीराने हजर असणाऱ्यांची मनेही तपासणार

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar NCP : अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत असले तरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी उभा दावा करणाऱ्या नेत्यांच्या बैठकीला अनेकांनी फक्त उपस्थित राहणे पसंत केले आहे.

मात्र मनाने ते अद्यापही शरद पवार यांच्याच पाठीशी आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुजबळ यांच्या नाशिक येथील मिरवणूक व बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांचीही मनेही तपासण्याचे काम सुरू झाले आहे. (work of checking minds of attending procession and meeting of chhagan bhujbal also started nashik news)

श्री. पवार यांनी बंडखोरीच्या दुसऱ्या दिवसापासूनच जनतेच्या मैदानात उडी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला या छगन भुजबळांच्या मतदारसंघात त्यांनी भव्यदिव्य सभा घेतली. त्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळही नाशिकमध्ये आले. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली.

एकीकडे शरद पवार यांच्या बैठक व सभेला गर्दी जमत असताना भुजबळ यांनीही शक्तिप्रदर्शन केले. मात्र या शक्तिप्रदर्शनात उपस्थित राहिलेले बहुतांश फक्त शरीराने उपस्थित होते, मनाने मात्र ते शरद पवार यांचे समर्थकच होते, असे चित्र समोर येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे मनाने पवार समर्थक असलेल्या नेत्यांची छाननी सुरू झाली असून, त्यांना पुन्हा राष्ट्रवादीकडे ओढण्याची तयारी सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सत्तेत असलेल्या भाजप, शिंदे गट व अजित पवार गट यांचे परस्परातील संबंध समोर येणार आहे. त्याचा लाभ उठवण्याची तयारी राष्ट्रवादीबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली आहे.

राष्ट्रवादीच्या जोडीला काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी जुने सर्व विसरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभी राहिली आहे. हॉटेल एमराल्ड पार्क येथे झालेल्या बैठकीत शहर काँग्रेसचे पदाधिकारी झाडून उपस्थित होते.

एका विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचे मन वळविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याला काँग्रेसची साथ मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT