potholes work doing by nmc workers in rain esakal
नाशिक

खडी, मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी; पावसामुळे खड्डा पुन्हा जैसे थे!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : पंचवटी परिसरात ठिकठिकाणी खड्डे (Potholes) पडले आहेत. सोमवारी (ता. १८) पुन्हा पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. भर पावसात मनपाचे (NMC) पंचवटी बांधकाम विभाग खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे.

खड्डे बुजविण्यासाठी केलेली तात्पुरती मलमपट्टी, मात्र वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. (work of filling potholes in Panchvati is going on in full rain nashik latest marathi news)

आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. रविवारी (ता. १७) पावसाने उसंत घेतली होती. यामुळे मनपा पंचवटी बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यासाठी सुरवात केली होती. सोमवारी सकाळपासून संततधार सुरू आहे.

मात्र, या भर पावसात मनपा प्रशासनाने पेठ रोडवरील सिग्नल, इंद्रप्रस्थनगर, दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल, आरटीओ कॉर्नर सिग्नल, अमृतधाम लिंक रोड, रासबिहारी लिंक रोड, कलानगर सिग्नल आदी ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.

या खड्ड्यामध्ये पाऊस चालू असल्याने फक्त मुरूम व खडी टाकून रोड रोलर फिरवला जात आहे. रहदारीसाठी मार्ग सुरू ठेवला जात आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने पुन्हा खड्डा हा मोकळा होतो, खडी मुरूम वेगळा होतो.

यामुळे दुचाकी खाली खडी येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले जाते. सर्व सामान्य जनतेला ये- जा करताना त्रास होऊ नये यासाठी मनपा प्रशासन सुटीच्या दिवशीदेखील सक्रिय कामकाज करीत खड्डे बुजविण्याचे काम करीत असते. मात्र, यास निसर्ग ही साथ देत नाही. पाऊस थांबला की, खड्डा हा योग्यप्रकारे बुजविण्यात येतो.

"पाऊस पडला की, डांबरी रस्त्याची चाळण होणे काही नाशिककरांना नवीन नाही. खडी व मुरूम टाकून खड्डा बुजविणे हा काही मूळ उपाय नसून तात्पुरता उपाय आहे. कारण पावसाचे दिवस असल्याने तो पडला की पुन्हा खड्डा जैसे थे होतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने पाऊस उघडताच पुन्हा खड्डा पडणार नाही, असे नियोजन करावे."

- विशाल बेंडकुळे, सामाजिक कार्यकर्ता.

"मनपा प्रशासन हे सर्वसामान्यांकडून वसूल होणाऱ्या कररूपी पैशातून विकासकामे करीत असते. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे सुरवातीच्या पावसातच पितळ उघडे पडते. सर्वसामान्यांना खड्ड्यातून मार्गक्रमण करीत जावे लागते. खड्डे बुजविण्याची भार पुन्हा सामान्यांवर पडतो. सदर खर्च हा संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा."

- मीना कडाळी- परदेशी, सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT