NMC news esakal
नाशिक

NMC News : नाशिक महापालिकेचे कामकाज ठप्प! मराठा सर्वेक्षणाचा परिणाम

जानेवारीअखेर मराठा सर्वेक्षणाचे फॉर्म भरून शासनाला अहवाल सादर करायचा असल्याने शहरी भागात महापालिकेची यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जानेवारीअखेर मराठा सर्वेक्षणाचे फॉर्म भरून शासनाला अहवाल सादर करायचा असल्याने शहरी भागात महापालिकेची यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. जवळपास २६०० प्रगणकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या कामाला सुरवात झाली आहे.

या सर्वेक्षणामुळे महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. दरम्यान, सर्वेक्षण करताना सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. (work of Nashik Municipal Corporation stopped Result of Maratha Survey server down NMC News nashik)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण केले. त्या उपोषणात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने मराठा समाजाचे आंदोलन चर्चेत आले.

जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची धार तीव्र करताना थेट राज्य सरकारविरोधात दंड थोपटले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आंदोलन तीव्र झाले. राज्य शासन व उपोषणकर्ते जरांगे-पाटील यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या अधिक वाढल्या.

अखेरीस महिना, दीड महिन्याच्या कालावधीनंतर जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी राज्य शासनाने कुणबी नोंदीचा शोध घेण्याचे फर्मान शासकीय यंत्रणेला सोडले.

एकीकडे आरक्षणासाठी माहिती संकलित केली जात असताना दुसरीकडे जरांगे-पाटील यांचे आंदोलनाची वेळ जवळ आल्याने राज्य शासनाने मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा इम्पेरिकल डेटा संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला केल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरी भागात महापालिकेला माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेचे २६०० कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन माहिती संकलित करायची आहे. त्याचे काम मंगळवार (ता.२३) पासून सुरू झाले.

प्रगणकांवर लक्ष ठेवण्यासाठी १५९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाकरीता प्रभागनिहाय ३१ पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आले आहेत. २६०० कर्मचाऱ्यांची मराठा सर्वेक्षणाकरीता नियुक्ती करण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट असून, कामकाज ठप्प झाले आहे.

सर्वेक्षणासाठी प्रगणकांना शासनाने ॲप उपलब्ध करून दिले असून प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागत आहे. जवळपास १७९ प्रश्‍न आहेत. सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यात सर्व्हर डाऊनचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT