Nashik city bus service
Nashik city bus service 
नाशिक

नाशिकमध्ये शहर बससेवेसाठी हालचाली गतिमान; आयुक्तांकडून पायाभूत सुविधांची पाहणी 

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. दिवाळीत बससेवा सुरू होणार होती; परंतु लॉकडाउनमुळे पायाभूत सुविधांचे काम अपूर्ण राहिले होते. दरम्यान महापालिकेकडून जानेवारीत बससेवा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून पायाभूत सुविधांची पाहणी बुधवारी (ता. ११) महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिक रोड भागात केली. 

लॉकडाउननंतर कामांना गती

बससेवा सुरू करण्याचा एक भाग म्हणून यापूर्वी बस ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. वाहक पुरविण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे, तर आणखी एक एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट यंत्रणा उभारणे, नवीन बसडेपो उभारणे, टर्मिनल, थांबे उभारणे या व इतर अनुषंगिक कामे अद्याप बाकी आहेत. लॉकडाउनमुळे कामे पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बससेवेसंबधी विविध कामांना गती आली आहे.

कामाला गती देण्याच्या सूचना

उर्वरीत कामे पूर्ण करून बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्याअनुषंगाने तपोवन व सिन्नर फाटा येथील डेपोची जागा, राज्य परिवहन महामंडळाचे निमाणी बसस्थानक, नाशिक रोड टर्मिनल, महामंडळाचे आनंदनगर, नाशिक रोड येथील बस डेपो बससेवेच्या आयटीएमएस यंत्रणेचे कंट्रोल कमांड सेंटर आदींची पाहणी केली. शहर बससेवा सुरू करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैंद, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT