The worker had stolen 25 thousand.jpg 
नाशिक

मालकाच्या गल्ल्यावर ठेवला डोळा!...अन् गेला बाराच्या भावात

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गेल्या महिन्यात पंचवटीतील दत्तनगरमध्ये किराणा दुकानाचा पत्रा उचकटून झालेल्या घरफोडीप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दुकानातीलच कामगाराला अटक केली. दुकानात काम करणाऱ्या कामगारानेच रात्री घरफोडी करीत 25 हजारांवर डल्ला मारल्याची कबुली दिली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. 

अशी आहे घटना

राहुल तुरे (रा. शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पंचवटी) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. दर्शन लुणावत (रा. दत्तनगर, पंचवटी) यांचे दत्त मंदिरासमोर किराणा दुकान आहे. 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्यांच्या दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून संशयित चोरट्याने गल्ल्यातील 25 हजारांची चोरी केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली फुलेनगर चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे तपास करीत होते. चोरी झाल्यापासून दुकानात कामाला येणारा संशयित राहुल तुरे कामावर येत नसल्याचे तपासातून समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. हवालदार विकास देशमुख, शेषराज केदारे, दशरथ निंबाळकर, सचिन म्हसदे, श्रीकांत कर्पे यांचे पथक फुलेनगरमध्ये संशयित तुरेचा शोध घेत त्याच्या घरी पोहचले.

पोलिसांना पाहून संशयित तुरेने घरातून पळ काढला. पाठलाग करीत त्याला अटक करण्यात आली. पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर संशयित तुरेने घरफोडीची कबुली दिली. चोरी केलेली 25 हजारांची रक्कमही जप्त करण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT