malegaon worker.png 
नाशिक

VIRAL : 'चमक्या लुगडं' नेसणारा 'पॉवरलूमचा कामगार तुफान व्हायरल...एकदा बघाच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : फुल्ल व्हायरल हैं बॉस...कोरोनामुक्तीचे मालेगाव मॉडेल... पॉवरलूम हीच पॉवर अन् डोंगरावरची माय सप्तशृंगी हा आनंदाचा ठेवा...म्हणत या कामगाराने केलेला हा डान्स नुसती धमाल करत आहेत. या व्हिडिओत 'चमक्या लुगड्या नेसनी ये माय...चमक्या लुगड्या नेसनी ये' कामगाराची अदाकारी तुम्हाला लुभावणारी नसेल तर नवलच...हा तुफान व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच 

अहिराणी डान्सवर ठेका

कोरोनाच्या फैलावामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे नाव देशभर पोहोचले होते. अत्यंत बिकट परिस्थिती असतांना प्रभावी नियोजन अन्‌ मालेगावकरांची उत्तम साथ लाभल्यानं कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात आलीय. मालेगावच्या अर्थकारणाला चालना देणारे पॉवरलूम सुरू झाल्यानं मजूर कामाला जायला लागले अन्‌ फैलावाला अटकाव झाला. पॉवरलूम हीच मालेगावची पॉवर असल्याचं यानिमित्त सिध्द झालेच. पण मालेगावची सुधारणारी परीस्थिती अन्‌ पॉवरलूममूळे अर्थकारणाला मिळालेला बुस्ट असा दुहेरी आनंदोत्सव साजरा करतांना अस्सल अहिराणी डान्सवर ठेका धरलेल्या श्रमजीवीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. पॉवरलूम सुरू झाल्याने एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखला गेला असतांना, सोबतच अर्थचक्रही फिरू लागले आहे.

कोरोनामुक्तीचे मालेगाव माॅडेल 
पाॅवरलूम हीच पाॅवर अन् डोंगरावरची माय सप्तशृंगी हा आनंदाचा ठेवा!!!
धमाल नुसती 

(साभार - WA वर एक मालेगावप्रेमी) pic.twitter.com/77QZmzoMRh

— Shrimant Mane (@ShrimantSakal) June 13, 2020

श्रमजीवीचा आनंद गगनात मावेना

कोरोनामुक्‍तीचे मालेगाव मॉडेल यशस्वी होत असतांना पॉवरलूम हीच पॉवर अन्‌ डोंगरावरची माय सप्तशृंगीचा आनंदाचा ठेवा. असा संदेश देत श्रमजीवीचा अहिराणी गाण्यावरील डान्स सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. जोरदार काम सुरू अन्‌ डान्स करता करता हातभार पॉवरलूममध्ये टिपलेल्या या व्हिडीओमध्ये मजूर मशीनवर काम करताय. तर दुसरीकडे अहिराणी गाणं सुरू असून, त्यावर एक श्रमजीवी संगीताच्या तालावर ठेका धरतांना दिसतोय. पॉवरलूममध्ये नाचत बागडतांना, नाचतांनाच आपल्या सहकारी मित्रांना कामात हातभार लावणाऱ्या या श्रमजीवीचा आनंद गगनात मावेना झाल्याची अनुभूती येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT