shinde vs Thackeray
shinde vs Thackeray esakal
नाशिक

Shinde Vs Thackeray : शहरातील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नको; ठाकरे गटाचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात भाजपचे तीन आमदार असून या आमदारांसह शिवसेनेच्या शिंदे (Shinde) गटाकडून शासन निधीच्या माध्यमातून विविध विकासकामे करताना महापालिका ऐवजी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे केली जातात. (Works in city should not be done by Public Works Department Thackeray group opposing bjp shinde group decision nashik news)

परंतु या कामांची गुणवत्ता नसल्याने महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे हस्तांतरित करण्यासाठी ना- हरकत दाखला देऊ नये या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका आयुक्तांकडे करत भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात दंड थोपटल्याचे शुक्रवारी (ता. ३) दिसून आले.

महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू असल्याने आमदारांच्या मार्फत शहरी भागात होणारे कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जात आहे. त्यासाठी महापालिकेचा ना- हरकत दाखला बंधनकारक केला आहे. महापालिकेने ना- हरकत दाखला देऊ नये. त्याला कारण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गुणवत्तापूर्ण कामे होत नाही.

असा आरोप करत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने करीत भाजप विरोधात दंड थोपटले आहे. त्याचबरोबर शासनाकडून विकास कामांसाठी निधी येणार असल्याची चर्चा असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटालादेखील आव्हान देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ग्रामीण भागात होत असलेली कामे गुणवत्तापूर्ण नाही तसेच रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. महापालिकेने ना हरकत दाखला दिल्यास न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या

भविष्यात महापालिकेत भरती होणार आहे. यात घंटागाडीचे ८००, सफाई कर्मचारी ७००, पाणीपुरवठा विभागातील ३००, वैद्यकीय विभागातील २८३ अशा जवळपास दोन ते अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

आगामी अंदाजपत्रकामध्ये भांडवली जमा रक्कमेमध्ये आस्थापना खर्च वजा करून जी शिल्लक रक्कम राहील त्यामध्ये साठ टक्के रक्कम शहर विकास व आरोग्य वैद्यकीय कामांसाठी प्रस्तावित करावी. तर, चाळीस टक्के रक्कम स्पील ओव्हरसाठी प्रस्तावित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर , माजी गटनेता विलास शिंदे, विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT