MLA Kishor & Narendra Darade
MLA Kishor & Narendra Darade esakal
नाशिक

Nashik News : येवल्यात 150 कोटींचे कामे पूर्णत्वाकडे; आमदार दराडे बंधूंचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांच्या पाठपुराव्यामुळे येवला मतदारसंघासह आपल्या कार्यक्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून ५० कोटींचे विकासकामे मंजूर झाली आहेत.

तर आतापर्यंत रस्ते, पूल, बसस्थानक, जलसंधारणाची सुमारे १५० कोटींचे कामे पूर्णत्वास गेली असून अजूनही २०० कोटींची कामे प्रास्तावित आहेत. या कामासह येवला-नांदगाव मार्गावरील वडगाव रेल्वे गेटवर उड्डाणपुलासह राजापूर ४१ गाव पाणीयोजनेसाठी शासनाने लवकरच निधी देण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. (Works worth 150 crore towards completion Follow up of MLA Darade brothers Nashik News)

नववसाहतींमध्ये विकासकामे

रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी दोन्ही आमदारांचा पाठपुरावा सुरु असून या कामामुळे मतदारसंघातील जनतेचे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मार्गी लागल्याचा विश्वास आमदार नरेंद्र दराडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे आदींनी नेहमीच सहकार्य केल्याने जवळपास सर्वच कामांना निधी मिळत असल्याचे दराडे यांनी सांगितले.

शहरामध्ये नववसाहती व शहरातील विविध भागांसाठी आमदार दराडे बंधूंच्या प्रयत्नाने ३० कोटी रुपयांच्या निधीच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले असून अजूनही २० कोटीची कामे होणार आहेत. तसेच शहरातील नववसाहती मधील रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये निधीला मंजुरी मिळालेली असून सदरील कामे लवकरच सुरू होणार आहेत.

सावरगाव बंधाऱ्यासाठी ५० लाख

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येवला-गोल्हेवाडी-नगरसुल-पिंपळखुटे रस्त्यासाठी सहा कोटी, येवला-वडगावबल्ले-गोल्हेवाडी-सायगाव-रहाडी रस्त्यासाठी पाच कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

येवला-लासलगाव मतदारसंघातील ९० गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आठ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आत्तापर्यंत २५ कोटी रुपयांचे कामे पूर्णत्वाकडे जात असून अनेक नवीन कामांना मंजुरी मिळालेली आहे.

सावरगाव येथील बंधारा दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सदर काम महामंडळाकडे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

वडगाव गेट येथे उड्डाणपूल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमीच्या परिसरातील विकासकामांसाठी १५ कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित केल्याने लवकरच तीही कामे सुरू होतील. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र विकास योजनेअंतर्गत दोन कोटी ८० लाख रुपयांच्या कामांची स्थगिती उठवणे व नवीन ९ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

येवला-नांदगाव राज्य महामार्गावर वडगाव गेट येथे रेल्वे विभाग व शासनातर्फे लवकरच उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविल्याने ५० कोटी रुपयांचा निधी अंदाजे प्रस्तावित केलेला आहे.

येवला-लासलगाव मतदारसंघासाठी निधी

जलसंधारण विभागांतर्गत साडेसहा कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती लवकरच उठणार असून तापी खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी नवीन सिमेंट प्लग बंधारे व जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी प्रास्तावित करण्यात आलेला असून लवकरच मंजुरी मिळेल.

अल्पसंख्याक क्षेत्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी अल्पसंख्याक बहुल गावांसाठी प्रस्तावित आहे. जनसुविधा योजनेअंतर्गत यावर्षी सव्वा कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. क्रीडा विभागाअंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम, कंपाउंड व साहित्यासाठी यावर्षी एक कोटी २० लाख रुपयांचा निधी येवला-लासलगाव मतदारसंघासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

देखभाल व दुरुस्तीसाठी निधी

पाटबंधारे विभागांतर्गत डोंगरगाव तलाव, कालव्याची देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी, डोंगरगाव धरणातून होणारी गळती शोधण्यासाठी बुडीत क्षेत्रात सिंचन विहिरीचे काम करणे व गळती प्रतिबंधक करण्यासाठी २० लाख, पालखेड डावा कालव्याच्या वितरिकाची देखभाल व दुरुस्तीसाठी १५ कोटी, खिर्डीसाठे लपा तलाव कालव्याची देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी, पालखेड डाव्या कालव्यावरील रस्ता १५ पूल दुरुस्तीसाठी १० कोटीची कामे प्रस्तावित केलेली असून लवकरच सदर कामांनाही चालना मिळणार आहे.

४१ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील छगन भुजबळ यांनीही पाठपुरावा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT