Deputy Commissioner of Police Prashant Bachhav while honoring the lecturer Devram Vadamare at the workshop organized in the context of NDPS at Nashik Police Headquarters. esakal
नाशिक

Nashik News: NDPS कारवाई, तपासाबाबत पोलिसांसाठी कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : समाजात वाढत्या अंमली पदार्थांची व्यसनाधिनता व त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अंमलीपदार्थविरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) करावयाची कारवाई व तपास याबाबत शहर पोलिसांसाठीची कार्यशाळा घेण्यात आली. (Workshop for police on NDPS action investigation Nashik News)

पोलीस मुख्यालयाच्या भीष्मराज बाम सभागृहात आयोजित या कार्यशाळेला मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक देवराम वडमारे, सेवानिवृत्त सहायक निरीक्षक बबन सानप यांनी मार्गदर्शन केले.

एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत विविध कलमान्वये करावयाची कारवाई व त्याबाबतचा सखोल तपास, तसेच त्यासाठीच्या नियमांची पूर्तता याबाबत व्याख्यात्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केेले.

तसेच उपस्थितांच्या शंकाचेही निरसन केले. प्रारंभी गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते वडमारे, सानप यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यशाळेला पोलीस ठाण्यातील एटीएस सेलचे अधिकारी, कर्मचारी तसेच अंमली पदार्थविरोधी पथक, गुंडाविरोधी पथक, खंडणी विरोधीपथक, शस्त्रविरोधी पथकांसह गुन्हेशाखेच्या युनिट एक, दोनचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT