Lumpy Disease  esakal
नाशिक

Lumpy Disease: लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने देवळा तालुक्यात चिंता! 15 दिवसांत 3 जनावरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Lumpy Disease : परिसरात लम्पी आजाराची पुन्हा लागण सुरू झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. भऊर (ता. देवळा) येथील संतोष रामभाऊ पवार यांच्या गाय व वासराचा लम्पी आजाराने पंधरा दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. बुधवारी (ता. ४) पुन्हा त्यांचा एक बैल दगावला.

या आजारामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. खामखेडा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष अवसर व डॉ. रोशन शिरसाट यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. माजी सरपंच दादाजी मोरे, माजी उपसरपंच सविता पवार यांच्यासह सदस्यांनी पशुपालकास नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. (Worry in Deola taluka due to increase in Lumpy Disease 3 animals died in 15 days nashik)

सध्या ग्रामीण भागात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. देवळा तालुक्यात सव्वाशेच्या आसपास लम्पी आजाराची जनावरे आहेत. या आजारात जनावरांच्या शरीरावर फोड येऊन जखमा होतात.

आजारानंतर जनावरांना ताप येणे, डोळे व नाकातून स्राव होणे, अंगावर गाठी येणे अशी लक्षणे दिसतात. परिणामी दुधात घट होत असून, जनावरे दगावण्याची शक्यता असते.

या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच आता पुन्हा लम्पी या विषाणुजन्य आजाराचा जनावरांवर प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी, दुग्धव्यावसायिक चिंताग्रस्त आहेत.

लम्पी आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. झांबरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil Video: ''..अन् माझ्यासमोरच कसाब खो-खो हसायला लागला'', विश्वास पाटलांनी सांगितला कोर्टरुममधला अनुभव

Big Breaking : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय अन् टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी जाणार; ६ सामन्यांच्या तारखा जाहीर

Rahul Gandhi on Indore Contaminated Water: "इंदुरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही, विष दिलं गेलं अन् प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत राहिलं"

Kolhapur Election : डमी उमेदवारांचे ४८ अर्ज माघार; आज अखेरचा दिवस, कोल्हापूरमध्ये गर्दी-तणावाची शक्यता

Kolhapur Politics : घारीच्या तोंडावर कोल्हापूरमध्ये पाळत, पाठलाग अन् दबावतंत्र; राजकीय रणधुमाळी शिगेला

SCROLL FOR NEXT