Police Recruitment  esakal
नाशिक

Police Recrutiment : पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा लांबणीवर

नाशिकच्या उमेदवारांना मिळतोय अभ्यासासाठी अधिकचा वेळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील भरतीला प्रारंभ झाला. या भरतीसाठीची मैदानी चाचणी अजूनही काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. काही जिल्ह्यात उमेदवारांची मैदानी चाचणी संपली आहे.

पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता लेखी परीक्षेची प्रतिक्षा लागून आहे. मात्र शासनाकडून अद्याप लेखी परीक्षेसाठीची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही. परिणामी, उमेदवारांना अभ्यासासाठी अधिकचा वेळ मिळतो आहे. (written exam for police recruitment been postponed nashik news)

महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेली होती. राज्यभरातील तरुणांकडून वारंवार भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्याची दखल घेत गेल्या नोव्हेंबर महिन्यात शासनाने पोलिस भरतीचे संकेत दिले.

त्यानुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. डिसेंबर महिन्यात अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर, २ जानेवारीपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ झाला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये रिक्त जागांची संख्या कमी असल्याने तेथील मैदानी चाचणी आटोपली आहे. काही जिल्ह्यांच्या ठिकाणी अजूनही मैदानी चाचण्या सुरू आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

यामुळे ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी होऊन ते पात्र ठरले आहेत त्यांना लेखी परीक्षेची प्रतिक्षा लागून आहे. मात्र अद्याप शासनाकडून पोलिस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेची तारीख निश्‍चित केलेली नाही. उलट, काही ठिकाणी मैदानी चाचण्या सुरू असल्याने लेखी परीक्षाच लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

‘कट’ऑफही जाहीर होईना

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १७९ जागांसाठीची मैदानी चाचणी २० तारखेपर्यत घेण्यात आल्या. सोमवारपासून (ता. २३) १५ जागांसाठीच्या पोलिस चालक पदासाठीची कट ऑफ जाहीर होऊन त्यानुसार ड्रायव्हिंगची चाचणी सुरू झाली आहे. परंतु, १६४ पोलिस शिपाई पदासाठीचा कटऑफ अद्याप जाहीर झालेला नाही. उमेदवारांना या कटऑफची प्रतिक्षा लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20 टाकल्याने वाहनाच्या कोणत्या गाड्यांचे होईल नुकसान? 'हे' पार्ट होणार खराब; सरकारने दिली महत्त्वाची माहिती

'लंकापती'चा रौद्र अवतार; तर रणबीर कपूरचा 'राम' पाहून चाहते भारावले! परंतु हनुमान सनी देओलच दिसला नाही, 'रामायण'चा ट्रेलर पाहिलात का?

Almatti Dam Controversy : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून गिरीष महाजनांचा कर्नाटकला थेट इशारा; सांगली-कोल्हापूरच्या महापुराबाबत मोठं विधान

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवरील आंदोलकांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ NSUI नेत्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Telegram Founder: ‘टेलिग्राम’चा संस्थापक गुन्हेगारांच्या यादीत; दहशतवादाला मदत केल्याचा रशियाकडून ठपका

SCROLL FOR NEXT