About the appointment of Yashwantrao Chavan as Chancellor of Maharashtra Open University. While felicitating Dilip Bharad, Vice-Chancellor Dr. Sanjeev Sonwane. Officers with esakal
नाशिक

YCMOU News : मुक्त विद्यापीठ कुलसचिवपदी दिलीप भरड! प्रदीर्घ काळापासून प्रभारींवर होती जबाबदारी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. दिलीप भरड यांची निवड जाहीर झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. दिलीप भरड यांची निवड जाहीर झाली आहे.

प्रदीर्घ कालावधीपासून विद्यापीठाचे कुलसचिवपद रिक्‍त असल्‍याने इतर अधिकाऱ्यांकडे प्रभारी कार्यभार सोपविला होता. दरम्‍यान नियुक्‍ती जाहीर झाल्‍यानंतर कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी डॉ. भरड यांचे स्वागत केले. (YCMOU Open University Chancellor Dilip Bharad For long time responsibility rested with those in charge nashik)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रभारी (स्थानापन्न) कुलसचिव पदावर डॉ. दिलीप भरड कार्यरत आहेत. यापूर्वी डॉ. दिनेश भोंडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्‍यापासून कुलसचिवपदी पूर्णवेळ नियुक्‍ती झालेली नव्‍हती.

विद्यापीठातर्फे कुलसचिव निवडीची प्रक्रिया राबविल्‍यानंतर जानेवारीमध्ये प्राप्त अर्जांची छाननी व मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्‍यानंतर नुकतीच डॉ. भरड यांची नियुक्‍ती जाहीर झाली आहे.

त्यांच्या नियुक्तीबद्दल कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी अभिनंदन केले.

याप्रसंगी वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक डॉ. भटूप्रसाद पाटील, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर, उपकुलसचिव सुनील विभांडिक, कक्ष अधिकारी गणेश चव्हाण उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT