this year cut off for class 11th admission will be above 90 percent 
नाशिक

अकरावी प्रवेश : यंदाही कट ऑफ नव्वद टक्क्यांहून अधिक! 

अरुण मलाणी

नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी महापालिका हद्दीतील महाविद्यालयांत ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. याकरिता नोंदणीप्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत २९ हजार ८३२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू होताच अवघ्या तीन दिवसांत नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ४८ विद्यार्थ्यांनी पर्याय निवडीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीकरिता पर्याय नोंदणीची मुदत शनिवार (ता. २२)पर्यंत असून, यंदाही विज्ञान शाखेतील प्रवेशाचा कट ऑफ नव्वद टक्क्यांहून अधिक राहणार आहे. 

दहावीचा निकाल उशिरा जाहीर झाल्‍याने इयत्ता अकरावी प्रवेशाच्‍या प्रक्रियेलादेखील विलंब झालेला आहे. त्‍यातच सध्याच्‍या कोरोना विषाणूच्‍या परिस्‍थितीत विद्यार्थी-पालकांनी महाविद्यालयात न जाता ऑनलाइन स्‍वरूपात बहुतांश प्रक्रिया राबविता येईल, अशी व्‍यवस्‍था शिक्षण विभागाने केली आहे. दरम्‍यान, नाशिक महापालिका हद्दीतील ६० महाविद्यालयांमध्ये २५ हजार २७० जागा उपलब्‍ध असून, याकरिता शुक्रवारी (ता. १४) सायंकाळपर्यंत २९ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी २३ हजार २४५ विद्यार्थ्यांनी अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर १२ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला आहे. पहिल्‍या गुणवत्ता यादीसाठी शाखा, महाविद्यालय पसंतीचा पर्याय निवडीसाठी आणखी आठवडाभराची मुदत असल्‍याने विहीत मुदतीत अर्ज भरलेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या संख्येत वाढ होणार आहे. यातून विज्ञान शाखेचा कट ऑफ नव्वद टक्क्यांमध्ये राहाणार असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे.  

संपादन - रोहित कणसे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT