1godavari_20river_0.jpg 
नाशिक

...अन् वारकऱ्यांसाठी गोदामाईच झाली चंद्रभागा...गावातच घुमणार हरिनामाचा गजर! 

सकाळवृत्तसेवा

नाशिक/निफाड : महाराष्ट्रातील लाखो भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायाची पताका घेऊन पंढरीच्या वाटेने दरवर्षी प्रस्थान करतात. पायी निघणाऱ्या दिंड्यांची वाट यंदा कोरोनाने रोखल्यामुळे सर्वच वारकऱ्यांचा हिरमोढ झाला आहे. मात्र तरीही विठ्ठलभक्तीची आस लागलेल्या भक्तांकडूनही गावातील मंदिरात पांडुरंगाची भेट घेत गोदाच चंद्रभागा मानत स्नान सुरू झाले आहे. 

तीस हजार वारकऱ्यांकडून हरिनामाचा गजर 

निफाड तालुक्‍यातील तीस हजारांहून अधिक वारकऱ्यांचा यंदा आपापल्या गावातच अषाढीला हरीनामाचा गजर घुमणार आहे. दिंडी प्रस्थानच्या दिवशी पादुकांना स्नान निफाड तालुक्‍यातून खेडलेच्या तुकारामबाबा संस्थानच्या प्रमुख दिंडीसह अनेक दिंड्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. जवळपास वीस एकवीस दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूरला पोहोचतात. अनेक गावांमध्ये मुक्काम करून त्या गावांमध्ये रात्रीचा कीर्तन करतात. भक्ती रसात गाव रंगून जाते. यानिमित्ताने वारकऱ्यांना गावातूनच अन्नदाते पुढे येऊन जेवण देतात. चहा, नाष्टा सगळ्या प्रकारची सोय या वारकऱ्यांची गावोगावी भाविक करतात. 

वारकऱ्यांचे विठुरायाला साकडे...

कोरोनाचे थैमान थांबावे यासाठी विठुरायाला अनेक वारकरी साकडे घालत आहेत. कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकऱ्यांना तुझ्या दर्शनाला येऊ दे, त्यासाठी महाराष्ट्र कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे घालत आहेत. योगिराज तुकाराम महाराज संस्थानकडून दिंडी प्रस्थानच्या दिवशी पादुकांना गोदामाईत चंद्रभागा समजुन स्नान घालण्यात आले. 

कोरोनामुळे वारी थांबली अन दिंड्यांचे प्रस्थानही थांबले असले तरी आपली गोदागंगा हिच चंद्रभागा आणि वै. योगिराज तुकाराम बाबा हेच पांडुरंग समजुन दर्शन घेत गावतच अषाढीला पांडुरंगा चरणी लीन व्हावे. 
- रघुनाथ बाबा खेडलेकर, उत्तराधिकारी योगिराज तुकाराम महाराज संस्थान, खेडलेझुंगे 

चाळीस वर्षांपासुन नियमितपणे पंढरीची वारी करत आलो आहे. माझ्या जीवनात अद्याप एकही वारी खंडित झाल्याचे मी अनुभवले नाही. मात्र कोरोनामुळे सर्वच ठप्प झाल्याने वारीला जाता न येण्याचे शल्य आहे. विठुनामाचा गजर टाळमृदुंगांचा निनाद अन वारकऱ्यांची गर्दी या सवयीमुळे एकलकोंडेपणा वाटतोय. - निवृत्ती महाराज कडवे, शिवडी ता. निफाड 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT