Yellow alert esakal
नाशिक

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात Yellow alert; उकाडा वाढणार...

अरुण मलाणी

नाशिक : राज्‍यातील विविध ठिकाणी हवामान खात्‍याने अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. अशात नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. त्यानुसार सोसाट्याच्‍या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. दरम्‍यान, काही दिवसांपासून पारा सातत्‍याने वाढत असून, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार आहे.

ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढणार...

काही दिवसांपासून शहरवासीय तप्त उन्‍हाची अनुभूती घेत आहेत. दिवसा उन्‍हाच्‍या झळांमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. राज्‍यस्‍तरावर अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्‍याने ढगाळ वातावरण निर्माण होत उकाडा वाढण्याची शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान खात्याने जारी केलेल्‍या अहवालानुसार सोमवार (ता. ७)पासून बुधवार (ता. ९)पर्यंत सोसाट्याच्‍या वाऱ्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्‍यामुळे पुढील तीन दिवस अत्‍यंत महत्त्वाचे असणार आहेत.

कमाल तापमान ३३.५ अंशावर

रविवारी नाशिकचे किमान तापमान १६.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस राहिले. शनिवारी (ता. ५) नाशिकचे किमान तापमान १५.६, तर कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस होते. काही दिवसांत नाशिकचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोचले आहे. त्‍यामुळे ऐन मेमध्ये पारा ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दबावात निर्णय: प्रकाश आंबेडकर;संघ मुख्यालयावर मोर्चाची केली घोषणा

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT