Director Bharat Samadiya while expressing support to former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal in Yevla Agricultural Produce Market Committee. esakal
नाशिक

Yeola Bazar Samiti: येवल्यात अपक्ष संचालकांचा ‘शेतकरी विकास’ला पाठिंबा! बाजार समितीत भुजबळ यांची एक हाती सत्ता

सकाळ वृत्तसेवा

Yeola Bazar Samiti : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाले.

या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले व्यापारी गटाचे उमेदवार भरत समदडीया व हमाल मापारी गटाचे उमेदवार अर्जुन ढमाले यांनीही पॅनलला पाठींबा देत असल्याचे पत्र दिले. (Yeola independent directors support for shetkari vikas Bhujbal won in Yeola Bazar Samiti election nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नाशिक येथील कार्यालयात श्री. भुजबळ यांची भेट घेऊन त्यांनी हे पत्र दिले. भुजबळ यांनी दोघांचेही स्वागत केले. पाठींब्याच्या पत्रात म्हटले आहे की, येवल्याच्या विकासाठी भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आम्ही त्यांना पाठींबा देत आहोत. या वेळी समदडीया, ढमाले यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सुरज पटणी, युवा नेते मकरंद सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, बाळासाहेब लोखंडे,

ज्ञानेश्‍वर शेवाळे, हुसेन शेख, नवनाथ काळे, मुश्रीफ शहा, भाऊसाहेब धनवटे, सतीश समदडीया, प्रणव समदडीया, कुलदीप परदेशी, पंकज भांबारे, केदू गोरे, संदीप लहरे, बाळासाहेब शिंदे, दत्तू कोटमे, केशव अकोलकर, बाबासाहेब काळे, शांताराम कोटमे, संदीप उगले, जनार्दन जानराव, शरद तांदळे, संदीप ढमाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्केतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT