Poet Neerja speaking at the first Marathi literary conference organized by the Sahitya Parishad branch here. Literary lovers present in the second photograph.
Poet Neerja speaking at the first Marathi literary conference organized by the Sahitya Parishad branch here. Literary lovers present in the second photograph. esakal
नाशिक

Yeola Marathi Sahitya Sammelan: राजकारणातील खालावलेला भाषेचा स्तर चिंतेचा : कवयित्री नीरजा

सकाळ वृत्तसेवा

Yeola Marathi Sahitya Sammelan : सोशल माध्यमासह राजकारणात भाषेचा स्तर खालावला असून, एकमेकांची उणीदुणी काढणे म्हणजे राजकारण झाले असून, ही चिंतेची बाब आहे.

आजची परिस्थिती पाहता खरंच हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का, असा प्रश्न पडतो. आजचे राजकारण व समाजकारणही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी केले. (Yeola Marathi Sahitya Sammelan Poet Neerja statement Degraded level of language in politics is concerned nashik news)

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखेतर्फे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी (ता २५) प्रारंभ झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. साहित्य संमेलनात पहिल्या सत्रात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) भगवान फुलारी यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तहसीलदार आबा महाजन, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, सेक्रेटरी डॉ. महेश्वर तगारे, मर्चंट्स बँकेचे उपाध्यक्ष सुहास भांबारे, स्वागताध्यक्ष विक्रम गायकवाड आदी उपस्थित होते.

नीरजा म्हणाल्या, की माझे नाव नीरजा आहे. मी माझ्या नावापुढे कोणाचेच नाव लावत नाही. हीच माझी ओळख. स्त्रियांनीही स्वतःची ओळख निर्माण करावी. आजच्या स्त्रीने कुणाचाही आधार शोधू नये. स्वतः स्वयंपूर्ण व्हावे. आपले संरक्षण आपणच करावे. कारण आपल्याशिवाय आपले रक्षण दुसरे कोणीही करू शकत नाही.

भगवान फुलारी यांनी साहित्यिक आणि कलाकार अमर असतात. बाकीचे मर्त्य आहेत. तानसेन ऐकायला मिळाले नाहीत. परंतु आत्ताच्या कलाकारांनी निर्माण केलेले साहित्य किंवा कला चिरकाल जतन करता येते.

दुसऱ्या सत्रात ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रम झाला. प्रा. गो. तु. पाटील प्रमुख पाहुणे होते. कवी आबा महाजन, उत्तम कोळगावकर, ज्येष्ठ कवयित्री आणि कथाकार नीरजा, ऊर्दू साहित्यिक एम. मुबीन यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तिसऱ्या सत्रात कवी अटलबिहारी वाजपेयी काव्यकरंडक काव्य स्पर्धा झाली. ज्येष्ठ कवयित्री आणि कथाकार नीरजा उपस्थित होत्या.

कवी लक्ष्मण बारहाते यांनी सूत्रसंचालन केले. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, योगेंद्र वाघ, गझलकार सचिन सताळकर, कवी रतन पिंगट, शिवाजी भालेराव, शंकर आहिरे, शरद पाडवी, बाळासाहेब हिरे, सुनील गायकवाड, बाळासाहेब सोमासे, अजीज शेख, सुवर्णा चव्हाण तसेच विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT