Chhagan Bhujbal, Ambadas Bankar, Narendra Darade, Kishore Darade, Marotrao Pawar, Sambhaji Pawar, Manikrao Shinde.
Chhagan Bhujbal, Ambadas Bankar, Narendra Darade, Kishore Darade, Marotrao Pawar, Sambhaji Pawar, Manikrao Shinde. esakal
नाशिक

Market Committee Election : बेरजेच्या राजकारणाने पहिली घंटा वाजली! विधानसभेच्या रंगीत तालमीचा अंक यशस्वी

संतोष विंचू

Market Committee Election : निवडणूक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची असली तरी माहोल मात्र विधानसभा निवडणुकीचा होता किंबहुना आरोप-प्रत्यारोप आणि आव्हान-प्रतिआव्हान थेट विधानसभेच्या उमेदवारीपर्यंत गेला होता.

विधानसभा निवडणुकीचा पहिला अंक मानल्या गेलेल्या या निवडणुकीच्या निकालातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पहिल्या अंकात बाजी मारली आहे. बेरजेच्या राजकारणात भुजबळ आजही प्लस मध्येच आहेत.

या निकालाने विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. (yeola Market Committee Election result Vidhansabhas Rehearsal Issue Successful nashik news)

येथील राजकारणात आजही माजी आमदार मारोतराव पवार व युवा नेते संभाजी पवार, आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे, सहकार नेते अंबादास बनकर आणि ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे या चार गटाचे वलय आहे.

प्रत्येकाची स्वतंत्र ताकद ओळखून भुजबळांना २००४ च्या निवडणुकीपासून कुणाला ना कुणाला आपल्या सोबत ठेवण्यात यश आले आहे. २०१९ पासून फक्त बनकरच सोबत असले तरी भुजबळांनी मागील विधानसभेत विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला होता.

मागील विधानसभा निवडणुकीतच पवार-दराडे -शिंदे एकत्र आल्याने वेगळ्या निकालाची चाहूल लागली होती पण तसे काही घडले नाही. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत हे तिघे एकत्र राहिले असते तर नक्कीच राजकीय पटलावर आखाडा चांगलाच रंगला असता.

मात्र तत्पूर्वीच भुजबळांचे येथील जबाबदारी असलेले नेते दिलीप खैरे यांच्या माध्यमातून गेल्या वर्ष-दोन वर्षापासून संभाजी पवारांना आपलेसे करण्याचे सुरू असलेले प्रयत्न मजूर फेडरेशन व बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने यशस्वी झाले.

हेच बेरजेचे राजकारण भुजबळ यांच्या पथ्यावर पडले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत बनकर व पवार यांना सन्मानजनक जागा देऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी देत भुजबळांनी अगोदरच अर्धी लढाई जिंकली होती.

त्यातच समोर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व भाजपची पॅनल निर्मितीसाठी मोठी जुळवाजुळवा झाल्याने सुरवातीला एकतर्फीच निकाल लागणार असे बोलले जात होते. मात्र शेवटी निवडणुकीत वेगवेगळ्या कारणाने रंगत भरली पण निकाल मात्र बदलला नाही.

आरोप प्रत्यारोपांमुळे चुरस!

मतदारसंघातील विविध विकासकामे तसेच २०२४ ला उमेदवारीच्या शक्यतेने गेल्या दोन-अडीच वर्षापासून भुजबळ व दराडे यांच्या संबंधात माशी शिंकली आहे. त्यातच दराडे बंधूनी सुरवातीला बाजार समितीच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती.

मात्र संवाद मेळाव्यात भुजबळ यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात दराडेंवर जोरदार टीकास्त्र केले आणि ही टीका अंगावर घेत निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरत रंगत वाढविली. अर्थात २०१९ मध्ये माणिकराव शिंदे यांनी आम्हीच भुजबळ यांना घालवणार हे काढलेले उद्गार यावेळी कोटमगाव येथे प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे यांनी काढले आणि येथूनच पुन्हा-आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला.

विधानसभेला माझ्या विरोधात उमेदवारी कराच असे थेट आव्हानच भुजबळांनी दिले आणि कुणाल दराडे यांनी हे आव्हान स्वीकारून उद्धव ठाकरेनी आदेश दिल्यास उमेदवारी करणारच असे प्रत्युत्तर दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली किंबहुना दोन्ही बाजूने सुकडी, पैठणीचा पाऊसही पडल्याने निकालाचा अंदाज लावणे कठीण झाले होते, मात्र भुजबळांसह पवार-बनकर यांची हक्काची एकगठ्ठा मते असल्याने निकालात फारसा बदल झाला नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता लक्ष आगामी निवडणुका

दोन्ही बाजूंनी बाजार समितीच्या निवडणुकीतून विधानसभेचे रणसिंग फुंकले खरे पण अजून जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक होणार आहेत. त्यासाठी दोन्ही गट आत्ताच टिळा लावून तयार आहेत, भुजबळांची बाजू वरचढ आहे. त्यामुळे विरोधकांना निवडणूक हलक्यात घेणे परवडणारे नाही हाही संदेश या निकालाने दिला आहे हे नक्की!

शेलार-दराडे पराभव जिव्हारी

एकीकडे सर्व पॅनल विजयी होत असताना थेट भुजबळांच्या संपर्कातील कार्यकर्ते म्हणून सर्वत्र ओळख असलेले समता परिषदेचे मोहन शेलार व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे यांच्या पराभवावर मात्र राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

सर्व गटाचे सर्व उमेदवार निवडून येतात, मात्र हे दोघेच पराभूत होतात यावर सध्या सोशल मीडियावर टीकाटिपणी व विचार मंथन सुरू आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाचाच हे दोघे बळी ठरल्याचेही समर्थकांकडून बोलले जात आहे.

किंबहुना शेलार यांच्या आभार पत्रावरून एका नेत्याचा फोटोच गायब झाल्याने याला पुष्टी मिळत आहे. राष्ट्रवादीला असा कलह भविष्यासाठी परवडणारा नाही, त्यामुळे स्वतः भुजबळांनाच यात लक्ष घालावे लागेल हेही तितकेच खरे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Sharan Singh : आता मी खुला सांड... तिकीट नाकारलेल्या ब्रिजभूषणनं कोणाला दिलं आव्हान?

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Nashik News : मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या चाकाखालून धुर! प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या

Yogi Adityanath : पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांना भारतात थारा नाही : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT