Officials of Shiv Sena, Prahar, Swabhimani and Ryat Kranti Farmers Association participated in the meeting regarding the market committee elections.
Officials of Shiv Sena, Prahar, Swabhimani and Ryat Kranti Farmers Association participated in the meeting regarding the market committee elections. esakal
नाशिक

Yeola Market Committee Election : येवल्यात शिवसेना लढणार निवडणूक! पालवे, शेळके यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : शिवसेना पक्षाची बाजू भक्कमपणे मांडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक सक्षम उमेदवार देऊन लढणार असून बाजार समितीवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना पॅनल रिंगणात उतरवणार आहे.

अशी माहिती येवला- लासलगाव विधानसभा प्रमुख अतुल पालवे, शिंदे समर्थक पांडुरंग शेळके यांनी दिली. (Yeola Market Committee Election Shiv Sena will contest elections soon Information about Pallavi Shelke nashik news)

बाजार समितीच्या निवडणुकीचे नुकतेच बिगूल वाजले आहे. यात सर्वच पक्ष आपली ताकद आजमावणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना जोमाने काम करत आहे.

एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यासाठी आत्तापर्यंत सुमारे बारा कोटी रुपयांचा निधी देखील येथील शिवसैनिकांनी मंजूर करून आणला आहेत. येथे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जोरदारपणे तयारी चालू असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे सर्वच जागा लढवल्या जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांच्या नेतृत्वामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे. यात चर्चा करून उमेदवारी देणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

महाविकास आघाडीला शह देण्यासाठी शिवसेना जोरदारपणे तयारी करणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अतुल पालवे व शेळके यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

मित्र पक्षांसोबत बैठक

बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक पार पडली. या वेळी एकोप्याने पॅनल निर्मिती करण्यावर चर्चा करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT