Devendra Fadanvis & MLA Kishore Darade
Devendra Fadanvis & MLA Kishore Darade esakal
नाशिक

Nashik News: येवला पोलिस निरीक्षक मथुरे यांची चौकशी; फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : एखाद्या अधिकाऱ्याने कुठल्याही लोकप्रतिनिधीचा अवमान करणे गंभीर आहे. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांची सात दिवसात वरिष्ठांमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, तसे निर्देश दिले आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२७) विधानपरिषदेत केली. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली. (yeola Police Inspector Mathure interrogated devendra Fadnavis announcement in Legislative Council Nashik News)

येवला येथे १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रीया सुरु असताना शहर पोलिस निरीक्षक श्री.मथुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रगती पॅनल प्रमुख व इतरांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या घरी काही कारण नसताना पोलिसांना दोन तास बसवून ठेवले. तसेच भाजपचे नगरसेवक प्रमोद सस्कर यांनाही धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. याशिवाय आमदार दराडे यांना एकेरी भाषा वापरून सदर ठिकाणाहून निघून जाण्याबाबत दम दिला.

केंद्रावरच हुज्जत घातली. या निवडणुकीत विरोधी पॅनलला पाठीशी घातले. यामुळे शहरात पोलिस निरीक्षकांच्या विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. शहरात लोकप्रतिनिधीच जर अशा अधिकाऱ्यांपासून सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेला हे कसे संरक्षण देणार, अशी भावना असून लोकप्रतिनिधीचा अवमान केलेला असल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी दराडे यांनी केली.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

यावर फडणवीस यांनी सदरच्या अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधीच्या सोबत वागणे निश्चितच चुकीचे व गैर असून याबाबत मी स्वतः देखील गंभीर आहे.या अधिकाऱ्यांची वरिष्ठ यांच्यामार्फत सात दिवसात चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. श्री. दराडेंनी निलंबनाचा आग्रह धरल्यावर फडणवीस म्हणाले की, अशा कारवाईत अधिकारी मॅट किंवा न्यायालयामार्फत स्थगिती मिळवतात. त्यामुळे चौकशी करूनच कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधीच्या अवमान प्रकरणी मी स्वतःच गंभीर असल्याने असे प्रकार गैर असल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदरच्या अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातून तत्काळ बदली करण्याची मागणी केली. यावरही फडणवीस यांनी चौकशीला अडथळा नको म्हणून त्यांची पोलिस ठाण्यातून त्वरित बदलीची घोषणा केली.

आमदार नरेंद्र दराडे यांनीही यात लक्ष वेधत जिल्हा पोलिस प्रमुख शहाजी उमप व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व अवैध धंदे बंद केले असल्याचे कौतुक करत येवल्यातील धंदे कसे सुरू आहे? या अधिकाऱ्याला कोणाचा पाठिंबा आहे. याची चौकशीची मागणी केली. यावर फडणवीस यांनी त्यांना कोणाचा पाठिंबा आहे याचीही चौकशी करण्याचे जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT