Tushar Pawar, Hrishikesh Gaikar performing mimicry and standup comedy at Sakal-Yin Art Festival on Friday.
Tushar Pawar, Hrishikesh Gaikar performing mimicry and standup comedy at Sakal-Yin Art Festival on Friday. esakal
नाशिक

YIN Art Festival : स्टॅन्डअप कॉमेडी अन्‌ मिमिक्रीने मनमुराद हसविले!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला मनमुराद हसण्याची जोड मिळताच दिवसभराचा शीण नाहीसा व्हावा. त्यायोगे अत्यंत मेहनतीने केलेली तयारी अन्‌ सरावाचे सार्थक व्हावे, काहीशी अशीच भावना घेऊन सारे सभागृहाबाहेर पडतील, याचीही काळजी तरुणाईने जाणीवपूर्वक घेतल्याची अनुभूती अंतिम टप्प्यातील स्पर्धेतून आली. (YIN art festival Stand Up Comedy Mimicry competition nashik news)

‘सकाळ’च्या यिन कला महोत्सवात मविप्रच्या आयएमआरटी इमारतीतील सभागृहात झालेल्या ‘स्टॅन्ड अप कॉमेडी आणि मिमिक्री’ स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित सर्वांनीच हा अनुभव घेतला अन्‌ अत्यंत प्रसन्न चित्ताने हसत हसतच पारितोषिक वितरण कार्यक्रमात पुन्हा भेटण्यासाठी सर्वांचा निरोप घेतला. तरुणाईच्या विनोदबुद्धीला, सकारात्मकतेला अन्‌ निरीक्षण क्षमतेला दाद देण्यास भाग पाडणारी ही स्पर्धा म्हणजे एकूणच कला महोत्सवाचा कळस ठरली.

जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने सादर केलेल्या विनोदी आविष्कारांनी संपूर्ण सभागृहाला मनमुराद हसविले. विषयाचे बंधन किंवा मांडणीची चौकट असा कुठलाही अडसर नसल्याने कलाकारांनी उत्स्फूर्तपणे आपली कला सादर केली. त्यातून ऐनवेळी घडणारे विनोदसुद्धा भावणारे होते. याशिवाय स्टॅन्डअप कॉमेडीच्या या विनोदी कलाप्रकाराला जोड मिळाली ती मिमिक्रीची. जुन्या-नव्या कलावंतांचे, राजकीय नेत्यांचे अन्‌ प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे हुबेहुब आवाज आणि संवादफेकीच्या लोकप्रिय लकबी सादर करताना कलावंतांनी अत्यंत मेहनतीने केलेल्या सरावाचा कस लागला. मात्र, प्रेक्षकांना मनापासून हसायला लावणारे त्यांचे सादरीकरण निश्‍चितच प्रभावी ठरले. सूरज बोढाई यांनी परीक्षक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT