Young bike rider killed in collision with bus after crossing divider trimbakeshwar nashik news esakal
नाशिक

Nashik Crime News : दुभाजक तोडून बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार; त्र्यंबकरोडवरील घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बेळगाव ढगा येथे त्र्यंबकेश्‍वरवरून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसचे (Bus) टायर फुटले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाक्यांना धडकली. (Young bike rider killed in collision with bus after crossing divider trimbakeshwar nashik news)

यात एका महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यु झाला तर, दोघे गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. सदरील अपघात शनिवारी (ता.११) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम देवेंद्र तासकर (२१, रा. दिंडोरी) असे मयत तरुणाचे नाव असून, तो केटीएचएम महाविद्यालयाच्या बीएस्सी कॉम्प्युटरचा तिसऱ्या वर्षाला शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम खासगी ट्रॅव्हल कंपनीची ट्रॅव्हल बसमधून काही भाविक त्रंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते.

सदरची ट्रॅव्हल बस त्र्यंबकेश्‍वरवरून नाशिककडे जात असताना सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास या खाजगी बसचे टायर फुटले. त्यामुळे बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक तोडूत विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली. त्यावेळी या बसने समोर येणाऱ्या ॲक्टिवा मोपेड दुचाकीला (एमएच ४१ सीजी २३६३) जोरदार धडक दिली. तसेच, आणखी एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

परंतु, बसच्या धडकेत ॲक्टिवा मोपेड बसच्या खाली सापडून फरफटत गेली. यात मोपेडस्वार ओम तासकर हा जागीच ठार झाला तर त्याच्यासमवेत असलेली आकांक्षा जाधव ही गंभीररित्या जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, दुसऱ्या दुचाकीवरील विनोद कुंटे, थोरात हे दोघेही जखमी आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम केटीएचएमचा विद्यार्थी

या अपघातातील मयत ओम तासकर हा केटीएचएम महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्सचा तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. त्र्यंबकेश्वर रोडवरील शैक्षणिक महाविद्यालयात उच्च शिक्षणाबाबतीत माहिती घेण्यासाठी तो आकांक्षा जाधव हिच्यासोबत जात होता. त्याच्या पश्‍चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा जीव वाल्मिकमध्ये एवढा का गुंतलाय? निवडणुकीत आरोपीची आठवण का काढावी लागतेय?

Ganesh Visarjan Noise Pollution : विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना नोटीस; २०० हून अधिक मंडळांचा समावेश

Zudio Theft : खरेदी कमी अन् चोरी जास्त! झुडिओमधून सगळ्यात जास्त कोणत्या वस्तूंची चोरी होते? सत्य जाणून शॉक व्हाल

Sangli Politics : एकाच घरातील उमेदवार भिडले! नात्यांच्या या राजकीय लढतीने आटपाडीकरांचे लक्ष वेधले!

Kolhapur Politics : कागल–मुरगूडसह आठ नगरपालिकांत ‘तुतारी’ गायब; सोयीच्या आघाड्यांमुळे शरद पवार गटाची वाढली अडचण, उमेदवार शोधताना पक्षाच्या तंबूत खळबळ!

SCROLL FOR NEXT