Death  esakal
नाशिक

वाघेऱ्या डोंगरावरुन पडून तरुणाचा मृत्यु

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : वणी- पिंपळगाव रस्त्यावरील वाघेऱ्या डोंगरावरून पडल्याने वणी येथील युवकाचा मृत्यु झाला आहे. डॉ. आंबेडकरनगर येथील प्रेम दौलत गांगुर्डे (१८) हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. आज सकाळी त्याबाबत माहिती कळाली. त्या अनुशंगाने पोलिस व काही ग्रामस्थांनी तपास केला असता वाघेऱ्या डोंगराच्या मध्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. वणी पोलिस व ग्रामस्थांनी मृतदेह खाली आणला.

सुमारे 75 मीटर उंचीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तीन दिवसापासून प्रेम हा घरी आलाच नाही. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोधाशोध केली, परंतु ठावठिकाणा लागला नाही. त्याच्या मित्राकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत व त्यांचे कर्मचारी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने औताळे शिवारातून डोंगरावरून मृतदेह खाली आणत पंचनामा करून विच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मृताचे मामा राजू काळे यांच्या माहितीवरून वणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Satej Patil Amal Mahadik Meet : अमल महाडिक मला वारंवार भेटतात पण, मुश्रीफ भेटत नाहीत; सतेज पाटलांनी गोकुळ, केडीसीसीतील इनसाईड स्टोरीच सांगितली

West Bengal election: भाजपने संधी दिली अन् भांडी घासणारी महिला झाली आमदार; कलिता मांझींचा थक्क करणारा प्रवास!

WhatsApp गुपचुप हटवत आहे सगळ्यांचे आवडते फीचर! तुम्हाला कळणारही नाही अन् बदलून जाईल तुमचे ॲप

ऋतुराजचा विक्रम धोक्यात? Sanju Samson ने एकाच हंगामात दोनदा केला 'हा' पराक्रम; दिल्लीच्या गोलंदाजांचा उडवला थरकाप

SCROLL FOR NEXT