प्रेम गांगुर्डे  esakal
नाशिक

मित्रानेच काढला काटा : डोक्यात दगड घालून केली हत्या

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : वणी - पिंपळगाव रस्त्यावरील औताळे गावाच्या शिवारातील वाघेरा डोंगरावर घरातून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकांचा डोंगरावरुन पडून संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली होती. याचा पोलिसांनी तपास करीत असतांना मयत मित्र हा नेहमी शिवीगाळ करीत असल्याचा मनात राग धरुन डोक्यात दगड घालून खुन केल्याची कबुली मयताच्या मित्राने दिली आहे.

८ जून रोजी प्रेम दौलत गांगुर्डे, वय १६, रा. आंबेडकर नगर वणी हा घरातून बेपत्ता होता. याबाबत पोलिस व नातेवाईक बेपत्ता प्रेमचा शोध घेत असतांना ११ जुन रोजी सकाळी ११ वा. सुमारास श्रावन रमेश सकट वय १८ वर्षे रा. राजवाडा वणी ता. दिंडोरी याने पोलीस स्टेशनला येऊन कळविले की, माझा मित्र प्रेम दौलत गांगुर्डे वय 16 वर्षे रा. राजवाडा, वणी ता. दिंडोरी हा व मी ता. ८ जुन रोजी दुपारी १२ वा. औताळे गावचे शिवारात वाघेरा डोंगरावर फिरण्यासाठी गेलो होतो.

त्यावेळी मित्र प्रेम गांगुर्डे याने नशा केलेली होती. व तो सेल्फी काढण्याच्या नादात वाघेरा डोंगावरुन पाय घसरुन खाली पडला. त्यावेळेस मी घाबरलो होतो. बाबत हकीगत सांगीतल्याने पोलिस घटनास्थळी पोहचुन प्रेम गांगुर्डे याचे प्रेत खाली उतरवुन वणी ग्रामिण रुग्णालयात घेवुन येवुन शवविच्छेदन करुन अकस्तमात मृत्यु दाखल करण्यात आला होता.

सदर अकस्मात मृत्युचा पोलिस अधिक तपास करता मयत प्रेम दौलत गांगुर्डे वय 16 वर्षे रा. राजवाडा, वणी ता. दिंडोरी याचे सोबत असलेला त्याचा मित्र श्रावन रमेश सकट याची विश्वासातच घेवुन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सांगीतले की, दिनांक 08/06/2022 रोजी दुपारी 12/00 वा. मी व माझा मयत मित्र प्रेम दौलत गांगुर्डे असे औताळे शिवारातील वाघेरा डोंगारावर फिरण्यासाठी गेलो होतो. मयत प्रेम गांगुर्डे हा मला नेहमीच काही ना काही कारणावरुन शिवीगाळ करत असल्याने तो मनात राग मनात धरुन त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याला वाघेरा डोंगरावर घेऊन गेलो.

या ठिकाणी दोघांनी नशापाणी केले. संशयित आरोपी याने प्रेम दौलत गांगुर्डे यांच्या डोक्यात दगड मारला. प्रेम ने त्याचा प्रतिकार केला परंतु दगडाचा मार गंभीर लागल्याने खाली कोसळला हे पाहुन पुन्हा संशयित आरोपीने त्याच्या डोक्यात पुन्हा दगड टाकला. वाघेरा डोंगरावरून फेकून दिले. घटनेनंतर संंशयीत घरी आला व कपडे लपवुन तयारी करून घोटीला निघुन गेला.

मयत मुलगा संशयीत आरोपीला त्रास देत असल्याचे त्याचे चौकशीत सांगीतले. यापुर्वी ही प्रेम याचा काटा काढण्याच्या उद्देशाने दोनदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दोन्ही वेळेस प्रयत्न फसला शेवटी तीस-यांदा त्याचा काटा काढल्याचे पोलिस चौकशीत समाेर आले आहे.

पोलिसांनी आरोपी श्रावण सकट याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी मार्गदर्शक सुचनांनुसार वणी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. स्वप्निल राजपुत यांनी व त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यां सोबत घटनास्थळावर जाऊन शहानिशा केली. आवश्यक असलेले पुरावे तेथे संकलीत केले. संशयीत आरोपीला घेऊन घटनास्थळावरून त्याचे कपडे ज्या दगडाने मारला तो दगड पोलीसांनी जप्त केला आहे. आरोपी विरोधात वणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तपास कामी पोलिस उपनिरीक्षक रतन पगार, प्रविण उदे, पोलीस.कर्मचारी साहेबराव वडजे, किरण धुळे, किरण गांगुर्डे, दिलीप राऊत, विजय खांडवी, प्रदिप शिंदे, कमलेश देशमुख यांनी काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

SCROLL FOR NEXT