sagar Sonavane esakal
नाशिक

Nashik News : तरुण अभियंता झाला मांजरगावचा उपसरपंच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात इंग्रजी माध्यमात शिक्षण... दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथे जाऊन एमआयटी संस्थेत सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण करून इंजिनिअर सागर सोनवणे यांनी बी. टेक केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांचा व्यवसाय हाती घेत कामाला सुरवात केली. मात्र, गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द मनाशी होती.

ज्या मातीत जन्माला आलो त्याचे ऋण फेडण्याची तीव्र इच्छा. यातूनच इंजि. सागर सोनवणे ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला अन्‌ विजयासह गावविकासासाठी २५ वर्षीय अभियंता सागर यास बिनविरोध उपसरपंचपदी बसवीत जबाबदारी दिली. (young engineer became deputy sarpanch of Manjargaon Nashik News)

निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी तरुण अभियंता सागर भास्कर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच वंदना सुनील सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली.

मांजरगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत इंजि. सोनवणे यांचा एकमेव अर्ज आला. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच वंदना सोनवणे, अध्यासी अधिकारी कल्पेश बरू, संपर्कप्रमुख मंडल अधिकारी भाऊसाहेब केवारी यांनी उपसरपंचपदी इंजि. सोनवणे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

या वेळी अनिता सानप, मीराबाई बोडके, सरला सोनवणे, मंगला गांगुर्डे, शंकर गांगुर्डे, लहानू आंबेकर हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

"वडिलांचा व्यवसाय सांभाळत असताना शासकीय अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आले. या शासकीय अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाचा उपयोग गावविकासासाठी करण्याचा प्रयत्न राहील. गावातील शाळा, अंगणवाडी स्मार्ट करण्याचा संकल्प आहे. शासकीय योजनांसह गावविकासासाठी विविध खासगी कंपन्या, संस्थांकडून निधी आणून स्मार्ट गाव करण्याचा प्रयत्न असेल." - इंजि. सागर सोनवणे, उपसरपंच (मांजरगाव, ता. निफाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: रायगड जिल्ह्यात शुक्रवार-शनिवार अवजड वाहतुकीला बंदी, कोणते मार्ग राहणार बंद?

अटकेनंतर पोलिसांसमोरच आरोपींनी मिश्यांना दिला पीळ, गुन्ह्याचा अभिमान असल्याचा अविर्भाव; चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही, VIDEO VIRAL

Ulhasnagar: उपचारासाठी रात्रभर धावपळ, पण वाचवता आलं नाही; एनआयसीयू अभावी चिमुकलीचा मृत्यू

'मी खोटा लैंगिक छळाचा आरोप केलेला 'भाभाजी घर पर हैं' फेम शिल्पा शिंदेची तब्बल ११ वर्षांनी कबुली, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : खोणी गावातील भाजपप्रवेश केलेले कार्यकर्ते पुन्हा मनसेत, गैरसमजातून प्रवेश केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT