एटीएममध्ये घुसलेली दुचाकी. esakal
नाशिक

तरुणीचा ताबा सुटल्याने दुचाकी घुसली ATM मध्ये

सकाळ वृत्तसेवा

सिडको (नाशिक) : सावतानगर येथील SBI बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट एटीएममध्ये घुसली. या अपघातात तरुणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटना ही बाजूलाच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

गौरी प्रदीप सैंदाणे (१८, रा. खांडे मळा) ही सकाळी ९. ३० च्या सुमारास घरातून निघाली. महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली व पैसे काढून बाहेर आल्यानंतर तीने दुचाकी सुरू केली. तिचा दुचाकीवरचा ताबा सुटल्याने तिच्याकडून गाडी समोरच असलेल्या एसबीआयच्या एटीएममध्ये घुसली. या अपघातामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.घटनेची माहिती कळताच अंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी तेथे दाखल झाले. तसेच, पोलिसांनी ही माहिती एसबीआय बँकेला कळविल्याने बँकेचे कर्मचारीदेखील या ठिकाणी दाखल झाले. तेथूनच जाणारे एक ज्येष्ठ नागरिक थोडक्यात वाचल्याचे प्रतक्षदर्शींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

Korean Peninsula Tensions: किम जोंग यांची हत्या झाल्यास अण्वस्त्र हल्ला; उत्तर कोरियाने स्वीकारले नवे धोरण

IPL 2026 : दिल्लीने पंजाबला हरवलं, पण कर्णधार अक्षर पटेलला BCCI ने सुनावली शिक्षा; नेमकी काय झाली चूक?

Maharashtra Cost Cutting Rules : महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT