devnadi pool.jpg 
नाशिक

देवनदीचे रौद्ररुप आणि तरुणाची मृत्यूशी झुंज ; ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत घडला थरार

विजयराम काळे

नाशिक / सिन्नर : त्यावेळी बाजारातील अनेकजण नदीपात्राकडे धावले. काहींनी नदीपात्रात उड्या मारल्या, तर काहीजण प्रवाहाच्या दिशेने धावले. मात्र, काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. देवनदीचे रौद्ररुप आणि तरुणाची मृत्यूशी झुंज असा अंगावर काटा आणणारा थरार ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत सुरू होता.बुधवारी (ता. २३) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. काय घडले वाचा...

देवनदीचे रौद्ररुप आणि तरुणाची मृत्यूशी झुंज

वडांगळी व खडांगळी (ता. सिन्नर) या गावांना जोडणारा देवनदीवरील पूलावरून ये- जा सुरु होती. जोरदार पाऊस आणि नदीने अचानक घेतले रौद्ररुप.. साधारण २२ ते २५ वर्षे वयाचा तरुण वडांगळी येथे आठवडे बाजारासाठी येत होता. पुलावरून वाहत असलेल्या पाण्याचा वेग अधिक असल्याने तो नदीपात्रात ओढला गेला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली असता, बाजारातील अनेकजण नदीपात्राकडे धावले. काहींनी नदीपात्रात उड्या मारल्या, तर काहीजण प्रवाहाच्या दिशेने धावले. मात्र, पाण्याचा वेग अधिक असल्याने तरुण वाहून गेला. पायी नदी ओलांडणारा हा तरुण स्थानिक असावा किंवा सोंगणीच्या कामासाठी पेठ परिसरातून आलेल्या मजुरांपैकी असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. पुलाच्या खालच्या बाजूला देवना बंधारा असून, त्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. शिवाय अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात खोलवर खड्डे आहेत. त्यामुळे त्या परिसरात कोणीही जायला धजावले नाही. 

शोध सुरूच..

देवनदीचा पूल ओलांडत असताना एक २२ ते २५ वर्षे वयाचा तरुण वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित तरुणाची ओळख पटली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकाराबद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार राहुल कोताडे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक रहाटे यांना माहिती दिली. वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या चांदोरी येथील जीवरक्षक पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, अंधार पडू लागल्याने हे पथक पोचू शकले नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. २४) शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT