Crime Update esakal
नाशिक

Nashik Crime Update : शाळकरी मुलींची छेड काढल्याने तरुणाला चोप

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : शुक्रवारी (ता. १८) पाथर्डी फाटा भागातील एक्स्प्रेस इन हॉटेल जवळ शाळकरी मुलींची छेड काढल्याप्रकरणी एका युवकाला या मुलींच्या पालकांनी आणि नागरिकांनी बेदम चोप दिला.

मात्र, गैरसमजातून हा प्रकार घडला असल्याचे इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांनी सांगितले असून संबंधित युवकाला चौकशीनंतर पालकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सांगितले.

याबाबतचा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी हॉटेल एक्स्प्रेस इन लगत असणाऱ्या रस्त्याने दोन विद्यार्थिनी रस्त्याने पायी जात होत्या. या वेळी एका तरुणाने मुलींची छेड काढली. (Young man fined for teasing school girls Nashik Crime News)

सदर प्रकार मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितला असता, तत्काळ घटनास्थळी पालक आले. या वेळी स्थानिक नागरिकांनी एकत्रित येत सदर युवकाला त्याच्या अंगावरील कपडे फाडत बेदम मारहाण करीत चोप दिला.

उपचारार्थ त्याला रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांना कळताच पोलिसही घटनास्थळी हजर झाले व सदर युवकाला ताब्यात घेतले. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT