murder sakal
नाशिक

दरेगाव शिवारात तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

संशयिताने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने डोके व चेहरा ठेचून मृताची ओळख पटू नये व पुरावा नष्ट व्हावा, असा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील दरेगाव शिवारातील बीफ कारखान्यासमोरील डोंगरावर इरफान खान गुलाब हुसेन (वय ३३, रा. गुलशेरनगर) या तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. संशयिताने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने डोके व चेहरा ठेचून मृताची ओळख पटू नये व पुरावा नष्ट व्हावा, असा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी मिजान अमीन खान (२१, रा. हनफिया सुन्नी मदरस्याजवळ) याच्या तक्रारीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात संशयिताने इरफानचा खून केला. खुनाचे कारण समजू शकले नाही. या खुनाचा तपास पोलिसांसमोर आव्हान आहे. खून झाल्याच्या ठिकाणी रक्तमिश्रित माती व २२ ते २५ किलो वजनाचा मुरुमाचा टणक दगड मिळून आला. सुरवातीला या मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती. मिजान या दरेगाव शिवारात जेसीबी चालविणाऱ्या तरुणाने मताला ओळखले. प्रारंभी पोलिसांनी बेवारस नोंद केली होती. ओळख पटल्यानंतर मिजानच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक वसंत भोये व सहकारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT