Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : Forex Tradingद्वारे तरुणाला तब्बल साडेआठ लाखांचा गंडा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विदेशी चलनाच्या व्यापाराशी निगडित असलेल्या ‘फॉरेक्स ट्रेडिंग’मध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा दहा टक्के ‘पे आउट’चे खोटे आश्वासन देत तरुणाला साडेआठ लाखांना गंडविण्यात आल्याची घटना आडगाव शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. (young man robbed for eight half lakh Through Forex Trading Nashik Crime News)

गजानन रघुनाथ पाटील (वय ३८, रा. फ्लॅट न. १३, विश्वा ॲव्हेन्यू अपार्टमेंट, समर्थनगर, आडगाव शिवार) असे तक्रारदाराचे नाव आहे. संशयित मनोज अभिमन्यू पाटील (वय ४०, रा. १५/१०४ भाग्योदय, बी. कॅबिन रोड, राहुल इस्टेट, अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) याने तक्रारदारास फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास त्या मोबदल्यात दरमहा दहा टक्के ‘पे आउट’ची रक्कम मिळेल. तसेच मूळ रक्कम जेव्हा पाहिजे असेल तेव्हा परत मिळेल, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.

त्यावर विश्वास ठेवून गजानन पाटील यांनी संशयितास वेळोवेळी साडेआठ लाख रुपये ऑनलाइन दिले. त्या पैशांवर संशयिताने तक्रारदार पाटील यांना तीन लाख ३२ हजार ५०० रुपये ‘पे आउट’ची रक्कम दिली. मात्र, उर्वरित ‘पे आउट’ व मूळ रक्कम आजपावेतो परत न करता फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून, सहाय्यक उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT