नाशिक

Nashik Crime: रुग्णालयात घुसून तरुणावर कोयत्याने वार; मालेगावला सामान्य रूग्णालयातील प्रकार

शहरात क्षुल्लक कारणावरून होणारी भांडणे व हाणामाऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : शहरात क्षुल्लक कारणावरून होणारी भांडणे व हाणामाऱ्या नित्याच्या झाल्या आहेत. येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रुग्णालयात घुसून कोयत्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला.

झटापटीत रुग्णालयाच्या काचांची तोडफोड झाली. ( young man was stabbed with knife after entering hospital nashik crime news)

उबेद शमसुद्दीन अन्सारी (२५, रा. इसाचौक संगमेश्वर) याला मागील भांडणाची कुरापत काढून काही तरुणांनी मारहाण केली. मारहाणीत उबेदच्या हातापायाला मार लागल्याने तो सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.

तेथे उबेदवर उपचार सुरु असतानाच काही गुंडांनी थेट ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश करत उबेदला कोयत्याने मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत उबेदच्या डोक्याला व हाताला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली.

या घटनेत सामान्य रुग्णालयातील काचा व फर्निचरचे नुकसान झाले. तसेच या वॉर्डात रुग्णालयातील कर्मचारी युवराज यालाही किरकोळ दुखापत झाली. गुरुवारी (ता.२१) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकारामुळे रूग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात शहर व छावणी पोलिस ठाण्यात कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. शहरात एवढा मोठा प्रकार घडल्याने पुन्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामान्य रुग्णालय आवारात कायमस्वरूपी पोलिसचौकी सुरू करावी, जेणेकरून अशा घटनांना पायबंद घालता येईल अशी मागणी येथील कर्मचारी तसेच रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : लातूरच्या खाजगी शाळांमध्ये पालकांची लूट

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT