nashik city police social media  esakal
नाशिक

Nashik Crime News : सर, तो मुलगा मला खूप त्रास देतो! आयुक्तांच्या व्हॉटसॲपवर मेसेज

‘सर, एका मुलाने माझ्या नावाने सुसाईड नोट लिहिली असून, तो मला खूप त्रास देतो,’ असा मेसेज एका युवतीने पोलीस आयुक्तांनी नाशिककरांसाठी सुरू केलेल्या व्हॉटसॲप हेल्पलाईनवर पाठविला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : ‘सर, एका मुलाने माझ्या नावाने सुसाईड नोट लिहिली असून, तो मला खूप त्रास देतो,’ असा मेसेज एका युवतीने पोलीस आयुक्तांनी नाशिककरांसाठी सुरू केलेल्या व्हॉटसॲप हेल्पलाईनवर पाठविला आणि त्याच गंभीर दखल आयुक्तांनी घेत संबंधित मुलाला ताब्यात घेत त्याच्या पालकांसमोर त्याचे कारनामे उघड करीत त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली.

त्या युवकाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करीत पुन्हा असे कृत्य केल्यास गंभीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. (young woman sent message on WhatsApp helpline started by Police Commissioner for Nashik citizens crime news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिककरांसाठी व्हॉटसॲप हेल्पलाईन सुरू केली. त्यास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून दखल घेतली जाते. यातील बहुतांशी तक्रारी या वादावादीच्या आणि टवाळखोरांसंदर्भात असतात.

मात्र, एक तक्रार युवतीची होती. या युवतीने, तिला एका युवकाने पाठविलेल्या सुसाईड नोटचा फोटो पोलिसांच्या या व्हॉटसॲप हेल्पलाईनवर पाठविला आणि हा मुलगा खुप त्रास देतो असाही मेसेज केला. व्हॉटसॲप हेल्पलाईनचे मॉनिटेरिंग करणार्या पथकाने याचे गांभीर्य ओळखले आणि तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याकडे ते पाठवून दखल घेण्याची सूचना केली.

संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित युवकाला पोलीस ठाण्याचे पाचारण केले. त्यानंतर त्याच्या पालकांनाही बोलावून घेत त्यांच्यासमोर युवकाचा कारनामा सांगितले.

तसेच, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर त्याचे दुष्परिणाम काय आणि कसे होऊ शकतात याचीही जाणीव करून दिली. पोलिसांनी संबंधित युवकाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई नोंदवून घेत, पुन्हा असे कृत्य वा मुलींची छेडछाडी केल्याचे समोर आल्यास थेट गुन्हा दाखल करून कारवाईचा इशारा दिला.

युवतीने मानले आभार

एरवी पोलिसांकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉटसॲप हेल्पलाईनमुळे तक्रारींची तत्काळ दखल घेत कारवाईही होते आहे.

युवतीनेही केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिला. त्यामुळे या युवतीने पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

"शहरातील महिला सुरक्षिततेला पोलिसांचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे कोणीही युवतीची छेडछाडी वा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल. युवती, महिलांनीही पोलिसांशी संपर्क साधावा."- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार पक्षाच्या 'हायकमांड'ला भेटण्यासाठी दिल्लीला जात आहेत

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT