crime latest marathi news esakal
नाशिक

Nashik : तरुणीकडून तोंडावर स्प्रे मारून युवकाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न

सतीश निकुंभ

सातपूर (जि. नाशिक) : एका पायी चालणाऱ्या तरुणाच्या चेहऱ्यावर एका तरुणीने विषारी स्प्रे (spraying) मारून बेशुद्ध करण्याची घटना समोर आली आहे. एखाद्या सिनेमातील दृश्‍यांप्रमाणे असा हा प्रकार सातपूरमध्ये घडला आहे.

घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाच्या नातेवाइकांनी पोलिसात धाव घेत कैफियत मांडून या तरुणीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. (Young woman tried to knock youth unconscious by spraying him on face nashik crime Latest Marathi News)

अशोकनगर परिसरात मुला- मुलीचा घोळका नेहमीच असतो. शाळा, कॉलेजच्या तसेच क्लासेसच्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. यामुळे अनेक टवाळखोरांचा या ठिकाणी वावरही असतो.

मुलींची छेड काढण्याचा प्रकार याठिकाणी सतत घडताना पाहायला मिळते. मंगळवारी (ता.१९) दुपारी मात्र काहीशी वर्दळ कमी होती. या वेळी मोपेड गाडीवर तोंडाला स्क्राप बांधलेली तरुणी पायी चालणाऱ्या हेमराज देवरे नावाच्या विद्यार्थ्याजवळ आली आणि पर्समधून विषारी स्प्रे काढून त्याच्या चेहऱ्यावर मारला.

यामुळे हेमराज काही क्षणातच बेशुद्ध पडला. परंतु, त्याचवेळी समोरून काही नागरिक येत असल्याचे पाहून ही तरुणी क्षणात पसार होते. मुलाला वेदना होत असल्याचे पाहून नागरीकांनी धाव घेतली व त्याच्या तोंडावर पाणी मारून थोड्या वेळाने शुद्धीवर आणले.

या प्रकारामुळे भेदरलेला हेमराज याने घरच्यांना सदर घटना सांगितली. आई- वडिलांनी लगेच सातपूर पोलिसात धाव घेऊन कैफियत मांडून या तरुणीचा शोध घेण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT