snehal birarsis esakal
नाशिक

नाशिक : राज्यातील सर्वांत तरुण कार्यकारी अभियंता!

प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : उत्राणे (ता. बागलाण) येथील स्नेहल पगार-बिरारीस यांची नाशिक जिल्हा परिषदेत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी नुकतीच पदोन्नती झाली आहे. अवघ्या २८ व्या वर्षी थेट कार्यकारी अभियंतापदी विराजमान होणाऱ्या स्नेहल पगार या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

राज्यातील सर्वांत तरुण कार्यकारी अभियंता

स्नेहल पगार-बिरारीस या २०१५ मध्ये सरळ सेवेद्वारे महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी सेवेत रुजू झाल्या. सुरवातीला वर्धा येथे सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून काम केल्यानंतर २०१८ पासून त्या नाशिक येथे दक्षता व गुण नियंत्रण मंडळ येथे सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या गुणात्मक कामाची दखल घेऊन शासनाने त्यांची पदोन्नती करत नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती केली. त्यांच्या या पदोन्नतीने सद्यःस्थितीत त्या राज्यातील सर्वांत तरुण कार्यकारी अभियंता ठरल्या आहेत. स्नेहल बिरारीस यांचे पती चेतन बिरारीस हेदेखील नाशिक येथेच सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. नाशिक येथील पाटबंधारे विभागातील अभियंता सुधीर पगार यांच्या त्या कन्या, तर धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शेतकी संघाचे सभापती विलास बिरारीस व नगरसेविका अलका बिरारीस यांच्या सून आहेत.

त्यांच्या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पाटील, राजे शिवाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अभय सावंत, माजी सरपंच प्रमोद सावंत, धर्मराज सावंत, राजू पानकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत, मुन्ना गायकवाड, मनींद्र सावंत, प्रशांत बैरागी, हिंमत सावंत, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन अहिरराव आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळकडून दूध उत्पादकांना मोठा दिलासा; म्हैस अन् गाय दूध खरेदी दरात वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांनो तिकीट सांभाळा! मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला; विनातिकीट प्रवासाला आळा बसणार

सीन करताना सेटवर कोसळली, बसलेला मानसिक धक्का; का झालेला प्राजक्ता माळीचा ब्रेकअप? म्हणाली-

IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल पंत शून्यावर आऊट, गंभीरची रणनीती फसली? पडिक्कलने लाज राखली; श्रीलंका इलेव्हनविरुद्ध ठोकले शतक

Creta Car Accident : दुचाकीला धडकेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळली क्रेटा, सासू सुनेचा मृत्यू; १३ तासानी गाडी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT