nitin kun 1.jpg 
नाशिक

अख्ख्या गावाचा लाडका २८ वर्षीय नितीनने जेव्हा अचानक घेतला जगाचा निरोप; संपूर्ण गावाला धक्का

धनंजय वावधने

सोग्रस(जि.नाशिक) : अतिशय समजदार, हुशार आणि नम्र स्वभावाच्या नितीनच्या अचानक एक्झिटने गावावर शोककळा पसरली. या घटनेसंदर्भात वडाळीभोई पोलिसांत नोंद झाली. पण नितीनने असे का केले असावे असा प्रश्न गावकऱ्यांना व नातेवाईकांना पडला आहे,

काय घडले नेमके?

कुंडाणे (ता. चांदवड) येथे शुक्रवारी (ता.२५) सकाळी सहाच्या सुमारास येथीलच नितीन सोमनाथ जाधव (वय २८) या युवकाने कुंडाणे शिवारातील अशोक जाधव यांचे शेत गट नंबर १६३ के बांधावरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ग्रामस्थ व त्यांचे काही नातलग यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित वडाळीभोई पोलिस ठाणे आणि स्थानिक पोलिस पाटील सूर्यवंशी यांना कळवली. नंतर ग्रामस्थांनी मृतदेह झाडावरून खाली काढून वडाळी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत म्हणून घोषित केले. दुपारी एकच्या दरम्यान येथील स्मशानभूमीत नितीन जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आकस्मिक मृत्यूमुळे गावावर शोककळा

मृत नितीनच्या मागे भाऊ आणि वयोवृद्ध आई असा परिवार आहे. अतिशय समजदार, हुशार आणि नम्र स्वभावाच्या नितीनच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली. या घटनेसंदर्भात वडाळीभोई पोलिसांत नोंद झाली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT